मोठी बातमी! इंदापूरमध्ये विहिरीची रिंग टाकत असताना रिंग कोसळून चार मजूर जमिनीखाली, मुरूम काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू..


इंदापूर : राज्यात दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असून यामध्ये अनेकांचे जीव जात आहेत. आता पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथील वन विभागाच्या हद्दीशेजारी असलेल्या खाणीतील विहीर तयार करताना रिंग कोसळून त्याखाली चार कामगार अडकल्याची माहिती समोर आली आहे.

रात्रीपासून या ठिकाणी अनेक पोकलेन मशीनच्या माध्यमातून या कामगारांचा शोध घेतला जात आहे. याठिकाणी विहिरीचे काम सुरू होते. ही विहीर मोठ्या आकाराची होती. या ठिकाणी विहिरीला रिंग बांधण्याचे काम सुरू असतानाच काल संध्याकाळी रिंग कोसळली.

मुरुमाखाली त्याठिकाणी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. काल संध्याकाळी कामगार घरी आले नाहीत म्हणून कामगारांच्या कुटुंबीयांनी या ठिकाणी भेट दिली, तेव्हा त्यांना हा प्रकार समजल्याचेही सांगितले जात आहे.

याठिकाणी अनेक मशीन कार्यरत असून या कामगारांचा शोध घेतला जात आहे. असे असले तरी याठिकाणी कामगार होते का असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. कामगार याठिकाणी काम करत होते असे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले.

सध्या याठिकाणी प्रशासकीय अधिकारी देखील थांबून आहेत. पोलीस यंत्रणा देखील याठिकाणी थांबून आहे. यामुळे आता त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!