अॅप वरुन कर्ज घेणे पडले भलतेच महागात, उरुळी कांचन येथील महिलेचे अश्लील फोटो बनवले आणि…

उरुळी कांचन : उरुळी कांचन येथे लोन ॲपच्या माध्यमातून एका ३७ वर्षांच्या महिलेची बदनामीसह फसवणुकीचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर झाला आहे.

हा प्रकार २४ ते ३१ जुलै २०२३ दरम्यान हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी फसवणुकीसह बदनामी आणि कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर पिडीत महिला हि उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत राहते. तिचे इन्स्टाग्राम या सोशल मिडियावर खाते आहे. फिर्यादी महिला एके दिवशी इन्स्टाग्राम पाहत असताना ऑन लाईन कर्ज देणाऱ्या “गोल्डन रुपी” या ॲप वरुन केवळ ३ हजार ७०० रुपयांचे कर्ज घेतले होते.

हे कर्ज घेताना विविध माहिती भरत ॲप डाऊनलोड करण्यास एका व्यक्तीने सांगितले. पैशांची गरज असल्याने महिलेने ते घेतलेही मात्र याच दरम्यान आपल्या मोबाईलमधील सर्व माहिती, विविध क्रमांक हे सायबर गुन्हेगाराने स्वतःकडे घेतले.
तसेच पैसे जमा केले नाहीतर त्याचे अश्लील फोटो कुटुंबीयांसोबत इतरांना पाठवून त्याची बदनामी करण्याची धमकी दिली होती. आपली बदनामी होऊ नये या भीतीपोटी महिलेने सर्व पैसे भरले. तरीसुद्धा महिलेला फोन करून आणखी पैशांची मागणी करण्याचा प्रकार सुरूच होता.
आणखी पैसे दिले नाहीत त्यामुळे सदर महिलेचे अश्लील फोटो बनवून नातेवाईकांना पाठविले. याप्रकरणी उरुळी कांचन येथील महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फिर्याद दिली.