अभिनेता प्रभास याचं फेसबूक पेज झालं हॅक, ‘हे’ व्हिडिओ झाले पोस्ट..


मुंबई : दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता प्रभास याचं फेसबूक पेज हॅक झालं आहे. ज्यामुळे अभिनेता चर्चेत आला आहे. फेसबूक पेज हॅक झाल्यानंतर प्रभास याने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांना महत्त्वाची माहिती दिली आहे.

गुरुवारी प्रभास यांचं फेसबूक पेज हॅक झालं आहे. हॅकर्सने अभिनेत्याच्या फेसबूक पेजवर दोन व्हिडीओ पोस्ट केले आहे. “अनलकी ह्यूमन” आणि “बॉल फेल्स अराउन्ड द वर्ल्ड” असे कॅप्शन देवून अभिनेत्याच्या फेसबूक पेजवरुन हॅकर्सने दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. एवढंच नाही तर, प्रभास याने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत फेसबूक हॅक झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे

अभिनेत्याने याबाबत ट्विट केले की, ‘माझ्या फेसबूक पेजसोबत ‘कॉम्प्रोमाइज्ड’ करण्यात आलं आहे.. टीम यावर काम करत आहे…’ सध्या हे ट्विट खूप व्हायरल झाले आहे.

या हॅकिंगची माहिती मिळताच अभिनेत्याच्या टीमने लगेचच कारवाई सुरू केली असून अधिकृत पेज परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत दरम्यान, प्रभासच्या फेसबुक पेजवर २४ मिलियन हून अधिक फॉलोवर्स असून तो फक्त आणि फक्त एसएस राजामौली यांनी फॉलो करतो…

प्रभास याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, प्रभास याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘बाहुबली’ सिनेमामुळे तर प्रभास याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली.

पण प्रभास स्टारर ‘साहो’, ‘राधे श्याम’ आणि ‘आदिपुरुष’ मात्र बॉक्स ऑफिसवर फेल ठरले. आता पुन्हा प्रभास याच्या नव्या सिनेमांकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!