सायबर चोरट्यांनी नर्सरी व्यावसायिकांना ‘गंडा’ घालण्याची लढवली ही शक्कल! पूर्व हवेलीत नर्सरी मालकांना फसवणूकीचा प्रकार सतर्कतेने उजेडात..!!


उरुळी कांचन : देशातील सर्वात मोठा शोभिवंत रोपवाटिकेचा हब असलेला पूर्व हवेलीतील रोपवाटिका अर्थात नर्सरी उद्योग आता सायबर चोरट्यांच्या रडारवर आला आहे.

या सायबर चोरट्यांनी आता ग्राहक बनून फेक एसएमएस मोबाईलवर नर्सरी उद्योजकाला पाठवून माल खरेदी करावयाचा म्हणून नर्सरी उद्योजकांना मोह दाखवून फसवणूक करण्याचा प्रकार चाणाक्ष नर्सरी उद्योजकांच्या सतर्कतेने प्रकाशात आला आहे.

पूर्व हवेली तालुक्यात नर्सरी उद्योगातून देशभरातून रोपवाटिकांची मागणी आहे. त्यासाठी काही ग्राहक हे आगाऊ माल खरेदी करण्यासाठी नर्सरी व्यवसायिकांना ऑनलाइनद्वारे पैसे पाठवत असतात.

याच पद्धतीचा वापर काही दिवसांपासून सायबर चोरटे हे करीत असून नर्सरी व्यावसायिकांना माल खरेदी करण्याच्या उद्देशाने अकांऊटची इन्फरमेन्शन्स टाकून पैसे टाकल्याचे फेक एसएमएस पाठवित आहे.

या फसवेगिरीत सायबर चोरटे हे पहिल्यांदा ग्राहकाला फोन करुन माल खरेदी करावयाचा आहे हे सांगत आहे. त्यानंतर काही किरकोळ रक्कम अकांऊटवर टाकत आहे.

संपूर्ण मालाची रक्कम विचारल्यानंतर ती रक्कम पाठवयाच्या ऐवजी अगाऊ स्वरुपाचा फेक पैसे पाठविल्याचा बँकेच्या खात्याशी जुळणारा तंतोतंत फेक एसएमएस पाठविला जात आहे.

परत रक्कम जास्त आली म्हणून पैसे माघारी पाठवताय का ? म्हणून नर्सरी व्यावसायिकाकडून सायबर चोरटे हे स्कॅनर कोड मोबाईलवर पाठवून पैसे खात्यावर माघून फसवणूकीचा प्रयत्न करीत आहे.

मागील काही सायबर चोरटे असे फेक एसएमएस करुन व्यावसायिकांना गंडा घालण्याचा प्रयत्न करीत आहे. पूर्व हवेलीतील सोरतापवाडी, आळंदी म्हातोबा, कुंजीरवाडी, कोरेगावमूळ, नायगाव परिसरातील नर्सरी व्यावसायिकांना हे सायबर चोरटे फसवणूकीच्या मोहात अडकवित आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून नर्सरी व्यवसायिकांना 7631367920 या नंबर वरून सुनीता शर्मा या नावाने माल घ्यावयाचा आहे किंवा जास्त पैसे तुमच्या अकाउंट ला जमा झालेत असं सांगून गंडा घालण्याची शक्कल या चोरट्यांनी शोधली आहे.

परंतु नर्सरी व्यावसायिकांनीही सायबर चोरीची घटना चाणाक्षपणे उघडकीस आणून नर्सरी व्यावसायिकांना सावध केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!