झारखंडमधील धनबादमध्ये भीषण आग; 10 महिला, तीन मुले आणि अन्य एकासह 14 जणांचा मृत्यू…!


रांची : भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. येथील जोराफाटक रोडवर असलेल्या आशीर्वाद टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली. आगीचे कारण गॅस सिलिंडरचा स्फोट असल्याचे सांगण्यात येत आहे. धनबादमधील एका अपार्टमेंटमध्ये लागलेल्या भीषण आगीत 10 महिला, तीन मुले आणि अन्य एकासह 14 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी धनबादच्या उपायुक्तांनी केली आहे. सध्या अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचल्यानंतर बचावकार्य सुरू आहे.

विशेष म्हणजे या टॉवरजवळ एक रुग्णालयही आहे. भीषण आगीमुळे अपार्टमेंटमध्ये राहणारे लोक प्रचंड घाबरले आहेत. डीएसपी कायदा आणि सुव्यवस्थेनुसार, धनबादमधील एका अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली. अनेकजण अडकल्याची भीती आहे. काही मृत्यूचीही नोंद झाली आहे. नेमका आकडा किती असेल याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. बचावकार्य अजूनही सुरू आहे.

मात्र, आशीर्वाद ट्विन टॉवर्सच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत ही आग पसरल्याचा दावा काही अहवालांकडून करण्यात येत आहे. ज्या घरात आग लागली त्या घरात लग्न झाल्याचा दावा केला जात आहे. या इमारतीत सुमारे 70 फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशीर्वाद टॉवरमध्ये 10 मजले आहेत. आगीवर अद्याप नियंत्रण मिळवता आले नाही. अग्निशमन दलाच्या 20 हून अधिक गाड्या घटनास्थळी आग विझवण्यात गुंतल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस दल आणि बचाव कर्मचारी बचाव कार्यात गुंतले आहेत. अपार्टमेंटमधील बहुतांश सदनिका रिकाम्या करण्यात आल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!