टीम इंडियाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड आता टीम इंडियाचा कर्णधार! बीसीसीआयने केली घोषणा..


मुंबई : टीम इंडियाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड याला लॉटरी लागली आहे. ऋतुराज गायकवाड याला टीम इंडियाचा कर्णधार करण्यात आलं आहे. बीसीसीआयने एशियन गेम्ससाठी भारतीय संघाची घोषणा केलीय. या एशियन गेम्साठी ऋतुराज कर्णधारपद सांभळणार आहे.

तसेच ऋतुराज टीम इंडियाकडून ९ टी २० सामने खेळला आहे. यामध्ये त्याने एकमेव अर्धशतक ठोकलंय. ऋतुराज गायकवाड याने आयपीएल १६ व्या मोसमात १६ सामन्यातील १५ डावांमध्ये ४ अर्धशतकांसह ५९० धावा केल्या. ऋतुराजने काही डावांचा अपवाद वगळता या हंगामात सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे.

तर रोहित शर्माच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाड संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. ही स्पर्धा सुरू असताना भारतात वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार रंगणार आहे.

त्यामुळे भारतीय संघातील प्रमुख खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळताना दिसून येणार नाही.या संघाची घोषणा होण्यापूर्वी असे म्हटले जात होते की, शिखर धवनला या संघाचं कर्णधारपद दिले जाऊ शकते. मात्र त्याला या संघात देखील स्थान दिले गेले नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!