पुण्याचे लाचखोर अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड अखेर निलंबित! घरी सापडलं होत पैशांच घबाड..

पुणे : पुण्याचे लाचखोर अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांचे निलंबन करण्यात आले आहे. सरकारच्या वतीने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.
रामोड यांच्या निलंबनानंतरही त्यांनी पुणे मुख्यालय सोडून जाता कामा नये. तसेच खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करता कामा नये. विभागीय आयुक्तांची परवानगी न घेता पुणे शहर सोडू नये, असे आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, अनिल गणपतराव रामोड यांना ९ जून रोजी लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात पकडण्यात आले होते. ही कारवाई सीबीआयने केली होती. त्यांना आठ लाख रुपायांची लाच घेताना रंगेहात पकडले होते.
त्यांच्या कार्यालयासह बाणेर आणि नांदेड येथील घरांवर छापे टाकले होते. या कारवाईत सीबीआयच्या हाती मोठे घबाड लागल्यामुळे रामोडची राज्यभर खूप चर्चा झाली. यामुळे काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
छापा टाकल्यानंतर रामोड यांच्याकडे तब्बल सहा कोटी रुपयांची रोकड आणि बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती.