आंबेडकर नगर झोपडपट्टीत दोन महिलांवर गोळ्या झाडल्या, घटनेने उडाली मोठी खळबळ…

नवी दिल्ली : दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील आरके पुरम भागात रविवारी एक मोठी घटना घडली. दोन महिलांवर गोळ्या झाडल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलांना रुग्णालयात दाखल केले.
तसेच या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हल्लेखोर प्रामुख्याने पीडित महिलेच्या भावावर हल्ला करण्यासाठी आले होते. हे प्रकरण पैशांच्या व्यवहारावरून वादाचे असल्याचे दिसते. पिंकी (३०) आणि ज्योती (२९) यांना गोळ्या लागल्याची माहिती मिळाली.
दोन्ही महिलांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. पोलीस तपासात गुंतले आहेत. आज पहाटे ४:४० वाजता आरके पुरम पोलीस स्टेशनला पीसीआर कॉल आला.
ज्यामध्ये आंबेडकर वस्तीमध्ये काही लोकांनी फोन करणाऱ्याच्या बहिणींना गोळ्या घातल्याचे म्हटले होते. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मोठी गर्दी झाली होती.