संत सोपानकाकांच्या भेटीसाठी लाखो वैष्णवांचा मेळा सासवड मुक्कामी! वैष्णवांचा मेळा अवघड दिवे घाट पार!!


सासवड : संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा लाखो वैष्णवांसह संत सोपानकाकांच्या सासवडनगरीत (ता. पुरंदर) बुधवार (दि.१४) रोजी दाखल झाला. पालखी सोहळा आता दोन दिवसाच्या मुक्कामासाठी सोपानकाकांच्या नगरीत विसावला आहे.

सासवडनगरीत माउलींच्या पालखीचे आगमन झाल्यावर चंदनटेकडी येथे नगरपरिषदेच्या वतीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखील मोरे, गटनेत्या आनंदीकाकी जगताप, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, उपनगराध्यक्ष यशवंतकाका जगताप, संजय ग. जगताप, सुहास लांडगे, विजय वढणे, अजित जगताप, मनोहर जगताप तसेच नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण, कार्यालय अधिक्षक संदेश मांगडे, अभियंता धोंडीराम भगनुरे, कर निरीक्षक उत्तम सुतार यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि विभाग प्रमुखांनी सर्व दिंडीतील प्रमुख, विणेकरी चोपदार व तुळशी वृंदावन धारक महिला यांना श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन माऊलींच्या पालखी रथाचे स्वागत केले.

पुणे शहराचा दोन दिवसांचा मुक्काम घेऊन संत सोपानदेवांच्या सासवड नगरीकडे मार्गस्थ झालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलीसह लाखो वैष्णवांनी टाळ मृदुंगाचा गजर व विठ्ठल नामाचा जयघोष करत आवघड दिवे घाट लिलय पार केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!