ब्रेकिंग! ईडीने अटक करताच ऊर्जामंत्री ढसाढसा रडू लागले, अन्…


चेन्नई : देशभरात ठिकठिकाणी ईडीच्या कारवाया सुरू आहेत. राजकीय नेते, अधिकारी आणि इतरांवर ईडीकडून कारवाया केल्या जात आहेत . तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीला सामोरे जावे लागले.

त्यांच्या सखोल चौकशीनंतर आज सकाळीच ईडीच्या अधिकाऱ्याने व्ही. सेंथिल बालाजी यांना अटक केली. अधिकारी जसेही सेंथिल यांना घेऊन जायला निघाले, त्याक्षणी सेंथिल यांनी हंबरडाच फोडला. सेंथिल यांनी गाडीतच ढसाढसा रडायला सुरुवात केली. त्यामुळे गोंधळ झाला.

एव्हाना त्याचे समर्थकही घटनास्थळी दाखल झाले होते. रडत असतानाच सेंथिल यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे ते अधिकच विव्हळू लागले. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लहान मुलासारखं रडले

काल ईडीच्या अधिकाऱ्यांनी ऊर्जा मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली होती. त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली. त्यानंतर आजही सेंथिल यांची चौकशी केली आणि ईडी त्यांना अधिक चौकशीसाठी घेऊन जाण्यास निघाली.

त्यावेळी सेंथिल यांनी जोरजोरात रडायला सुरुवात केली. लहान मुलासारखं ते रडायला लागले. ऊर्जा मंत्री कारमध्येच झोपले. आणि ढसाढसा रडू लागले. त्याचवेळी त्यांची तब्येत बिघडली. छातीत कळा आल्या. त्यामुळे अधिकारी त्यांना तात्काळ चेन्नईच्या ओमांदुरार सरकारी रुग्णालयात घेऊन गेले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!