मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय! सर्व दौरे आणि नियोजित कार्यक्रम रद्द, नेमकं कारण काय?

मुंबई : धाराशिव जिल्ह्यात चारा टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता असताना राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहा लाखांहून अधिक पशुधनाला मोठा दिलासा मिळणार आहे. जानेवारी महिन्यात या चारा छावण्या प्रत्यक्ष सुरू होण्याची शक्यता असून, प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.
डिसेंबरपर्यंतच पुरणार उपलब्ध चारा

धाराशिव जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेला चारा डिसेंबर महिन्यापर्यंतच पुरेल, असा अंदाज पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला आहे. त्यानंतर पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून चारा छावण्या सुरू करण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी केली जात आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

चाऱ्याच्या जुन्या दरांनाही मंजुरी

दरम्यान, चारा छावण्या सुरू करण्यास मंजुरी देतानाच चाऱ्याच्या पुरवठ्यासाठी 2001 मधील जुने दर लागू ठेवण्यासही सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे चारा छावण्यांच्या नियोजनाला गती मिळणार आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी चारा छावण्यांना मंजुरी मिळाल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दिली आहे.
जानेवारीपासून चारा छावण्या सुरू होण्याची शक्यता
जिल्ह्यातील पशुधनाची संख्या आणि उपलब्ध चाऱ्याचा साठा लक्षात घेता जानेवारी महिन्यापासून चारा छावण्या सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे चारा टंचाईच्या संकटात सापडणाऱ्या पशुपालकांना मोठा आधार मिळणार आहे. आता प्रशासनाकडून चारा छावण्यांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी कोणती पावले उचलली जातात, याकडे जिल्ह्यातील पशुपालकांचे लक्ष लागले आहे.
