भाजपसोबत गेल्यास मुख्यमंत्रीपद मिळणार? अखेर सुप्रिया सुळेंनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, माझ्यावर अन्याय करु नका, 2014 पासून…


पुणे : गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाटाघाटी सुरु असल्याचे सांगितले जात आहे. या वाटाघाटी सुरु असताना अनपेक्षितपणे शरद पवार यांनी एनडीएत जाण्याच्या मोबदल्यात सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव भाजपसमोर मांडल्याची चर्चा सुरु झाली होती.

यामध्ये संसदेतील लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमेटशन विधेयकाला पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेस भाजपप्रणित एनडीए आघाडीत सामील होणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपदाविषयी विचारणा केली. यावर सुप्रिया सुळे यांनी सर्व चर्चा निराधार असल्याचे सांगितले.

त्या म्हणाल्या, देशाचे आर्थिक धोरण ठरवणाऱ्या वित्तीय समितीमध्येही माझा समावेश आहे. माझं भाग्य आहे की,राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळते, त्याच्यावर एखादा जरा कोणी प्रश्न विचारला तर मला आनंद होईल. महाराष्ट्रात दुष्काळ आहे. चार जेपीसींमध्ये देशपातळीवरील अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा सुरु आहे. यामुळे तुमच्या आमच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो.

तसेच गेले 12 वर्षे माझा शपथविधी होतोय, माझ्यावर अन्याय करु नका. 2014 पासून मी मुख्यमंत्री होतेय, मला या कुठल्याही कथांमध्ये रस नाही. मला फक्त दुख: एका गोष्टीचे आहे की, ज्या पॉलिसी मेकिंगसाठी मी संसदेत निवडून गेले, त्याबद्दल गांभीर्याने मला कोणीच विचारत नाही. मी सध्या चार संयुक्त संसदीय समित्यांवर आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर त्यांनी जोपर्यंत यावर अधिकृतरित्या कोणी बोलत नाही, तोपर्यंत मी भाष्य करणार नाही. आमचे महायुतीचे सरकार मजबूत आहे. आमच्याकडे 238 संख्याबळ आहे. भाजपचे 132 आमदार, आमदार शिंदे 60 राष्ट्रवादीचे 41 आमदारांचे संख्याबळ आहे, असे म्हटले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!