भाजपचा सर्वात मोठा दे धक्का! केली मोठ्या पक्षाशी महायुती, देशात २०२९ ला राजकीय समीकरणे बदलणार?


नवी दिल्ली : देशात सध्या भाजप विरोधात वातावरण तापले असताना भाजपने विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. आता पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठं यश आलं आहे. भाजप आणि शिरोमणी अकाली दलाची युती झाली आहे. तब्बल सहा वर्षानंतर दोन्ही पक्षांची युती झाली आहे. गुरु नानक देव यांच्या जयंतीचं औचित्य साधून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी याबाबत घोषणा केली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे उपस्थित होते. ही युती हिंदू आणि शीख एकतेचं प्रतिक आहे. आम्ही सर्व अकाली दलासोबत मिळून पंजाबची निवडणूक लढणार आहोत. पंजाबला नशामुक्त करणं हे एनडीएचं लक्ष आहे.

2031 पर्यंत आम्ही पंजाबला नशामुक्त करू हे आम्ही वचन देतो. आम्ही दोन्ही पक्षांनी पंजाबला नशामुक्त करण्याचा निर्धार केला आहे. आम्ही पंजाबच्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार आहोत, असं अमित शाह यांनी सांगितले. अमित शाह यांनी अकाली दल आणि भाजपच्या युतीची घोषणा करतानाच सुखबीर सिंग बादल यांचं एनडीएमध्ये स्वागत आहे, असं म्हटलं आहे.

नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्य कार्यालयात या महायुतीची घोषणा करण्यात आली आहे. जागा वाटपावरून अजून मतभेद आहेत. बीजेपीला पंजाबमध्ये एकूण 117 जागांपैकी 55 जागा लढायच्या आहेत. तर अकाली दल भाजपला केवळ 45 जागाच द्यायला तयार आहे. अकाली दल आणि भाजप 1996 ते सप्टेंबर 2020 पर्यंत युतीत होते.

दरम्यान, 2020 मध्ये केंद्र सरकारने कृषी कायदे आणले होते. त्याला अकाली दलाने विरोध करून एनडीएशी फारकत घेतली होती. अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. आता सहा वर्षानंतर दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!