सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी, १९ नोव्हेंबरचे भाव जाहीर

पुणे : सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. मौल्यवान धातूंच्या दरातील घसरण सलग सहाव्या दिवशीही कायम राहिली आहे. १८ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅममागे ३,०३७ रुपयांनी घसरला असून तो १.३१ लाख रुपयांच्या आसपास आला आहे. विशेष म्हणजे, सोन्याचा दर गेल्या ११ महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.


सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. चांदीचा भाव प्रति किलो ५,४३८ रुपयांनी कमी होऊन सुमारे १.६४ लाख रुपयांवर आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलर मजबूत होणे आणि गुंतवणूकदारांकडून नफावसुली सुरू असणे ही या घसरणीमागील प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी उच्चांकापासून मोठी घसरण

यावर्षी २९ जानेवारी रोजी सोने आणि चांदीने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. त्यावेळी चांदीचा भाव प्रति किलो ३.८० लाख रुपयांपर्यंत पोहोचला होता. मात्र, आता त्यात मोठी घसरण झाली आहे. दुसरीकडे, २४ कॅरेट सोन्याचा दरही जानेवारीतील १.७६ लाख रुपयांच्या उच्चांकावरून सुमारे १.३१ लाख रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घट पाहायला मिळत आहे.
आजचा सोन्याचा भाव किती?
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) माहितीनुसार, गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३१,१६४ रुपये इतका आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम):
मुंबई – ₹१,३१,१६४
ठाणे – ₹१,३१,१६४
रत्नागिरी – ₹१,३१,१६४
पुणे – ₹१,३१,१६४
नागपूर – ₹१,३१,१६४
कोल्हापूर – ₹१,३१,१६४
छत्रपती संभाजीनगर – ₹१,३१,१६४
जळगाव – ₹१,३१,१६४
सांगली – ₹१,३१,१६४
बारामती – ₹१,३१,१६४
आज चांदीचा भाव किती?
IBJA च्या आकडेवारीनुसार, गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी चांदीचा दर प्रति किलो १,६३,७३३ रुपये इतका नोंदवण्यात आला आहे.
सोन्या-चांदीच्या दरातील घसरणीमुळे ग्राहकांचे लक्ष आता सराफा बाजाराकडे लागले आहे. मात्र, दागिने खरेदी करताना प्रत्यक्ष बाजारभाव, जीएसटी आणि घडणावळ यामुळे अंतिम किंमत वेगळी असू शकते.
