शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात टाकला असा डाव की ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या; सुनावणीत मोठा युक्तिवाद


मुंबई : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेला संघर्ष पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीदरम्यान शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहता यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. २०१९ मधील कर्नाटकातील सत्तास्थापनेच्या प्रकरणाचा दाखला देत त्यांनी आपली बाजू मांडली. त्यांच्या युक्तिवादामुळे या प्रकरणातील कायदेशीर चर्चेला पुन्हा वेग आला आहे.

कर्नाटकातील सत्तास्थापनेच्या प्रकरणाचा दाखला

सुनावणीदरम्यान ध्रुव मेहता यांनी दहाव्या अनुसूचीचा संदर्भ देत काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. शिंदे गटातील कोणत्याही पदाधिकाऱ्याने राजीनामा दिलेला नव्हता, तसेच सदस्यांना अपात्र ठरवायचे की नाही, याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. सदस्यांना त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटपर्यंत अपात्र ठरवण्याचा प्रश्नही त्यांनी न्यायालयासमोर मांडला.

भाजप-शिवसेना युती तुटल्याचा मुद्दा उपस्थित

युक्तिवाद करताना मेहता यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेमध्ये युती असल्याचा दाखला दिला. निवडणुकीनंतर ही युती तोडण्यात आली. हा मतदारांचा अपमान होता आणि त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते नाराज झाले, असा दावा त्यांनी केला.

शिवसेना आणि भाजपची विचारधारा एकच असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये शिवसेनेचीच भूमिका महत्त्वाची होती, असेही मेहता यांनी नमूद केले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सरकार कायम ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याचा युक्तिवादही त्यांनी केला.

शिंदे गटाच्या वकिलांना युक्तिवाद पूर्ण करण्याचे निर्देश

शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ध्रुव मेहता यांनी सलग तीन सुनावण्यांमध्ये युक्तिवाद केला आहे. आजच्या सुनावणीवेळी न्यायालयाने त्यांना युक्तिवाद पूर्ण करण्यास सांगितले. त्यावर लवकरात लवकर युक्तिवाद पूर्ण करण्याचा आपलाही प्रयत्न असल्याचे मेहता यांनी न्यायालयाला सांगितले.

यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात बाजू मांडली होती. आता शिंदे गटाकडून मांडण्यात येणारे मुद्दे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!