ठाणे पोलीस आयुक्तांचा मोबाईल हॅक! स्टेटसवर आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड, पोलीस दलात खळबळ


ठाणे : ठाण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. अकाउंट हॅक केल्यानंतर त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर १२ हून अधिक अश्लील व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे ठाणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या अकाउंटवरून १२ पेक्षा अधिक अश्लील व्हिडिओ स्टेटसला ठेवण्यात आले. थेट पोलीस आयुक्तांचेच अकाउंट हॅक झाल्याने या घटनेची गंभीर दखल घेतली जात आहे.

हॅकरचा शोध सुरू

या प्रकरणात अकाउंट हॅक करणाऱ्या व्यक्तीचा शोध ठाणे पोलिसांकडून घेतला जात आहे. पोलीस आयुक्तांच्या व्हॉट्सॲप अकाउंटवरून अशा प्रकारचे व्हिडिओ अपलोड झाल्याने पोलीस दलात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.

पोलीस आयुक्तांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे अकाउंट हॅक होण्याच्या घटनेमुळे सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सामान्य नागरिकांच्या सोशल मीडिया आणि मेसेजिंग अकाउंटच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात आणि हॅकरचा शोध कधी लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!