दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांसाठी मोठी मदत! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचा मोठा निर्णय


मुंबई : राज्यातील विविध भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याची तयारी सुरू असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आणखी मदत केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष सरकारच्या मदतीकडे लागले आहे.

दरम्यान, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या सर्व आमदारांनी आपल्या एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे जाहीर केले आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी सर्व आमदारांच्या वतीने वेतनाच्या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी पुढाकार घेतला आहे.

यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या, “शेतकरी बांधवांवर ओढवलेल्या संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देणे, हीच अजितदादांनी आपल्याला दिलेली खरी शिकवण आहे. दादांच्या याच विचारांचा वारसा पुढे नेत शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी योगदान देणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. शेतकरी बांधवांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध राहणे, हाच या निर्णयामागील प्रामाणिक भाव आहे.”

शिंदे गटही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे

दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटानेही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे जाहीर केले आहे. “शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे. त्यांना कोणतीही कमतरता भासू देणार नाही,” असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

शेतकऱ्यांवरील संकट मोठे असून, जिथे संकट असेल तिथे शिवसेना उभी राहते, ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची शिकवण शिवसैनिक पुढे नेत असल्याचेही त्यांनी सांगितले. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी पक्षातील कार्यकर्ते, मंत्री, खासदार आणि आमदारांना दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!