इंदापूरच्या कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्यावर हर्षवर्धन पाटील यांचीच सत्ता, निवडणूक बिनविरोध केल्यानंतर चेअरमनपदीही पाटलांची निवड


इंदापूर : येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी मंत्री आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची निवड करण्यात आली आहे. कारखाना निवडणुक ही बिनविरोध झाली होती. उपाध्यक्षपदी छगनराव भोंगळे यांची निवड करण्यात आली आहे.

सध्या हा कारखाना ओंकार ग्रुपकडे करारावर चालवण्यास दिला असून कारखान्याच्या निवडणुकीत 21 संचालक बिनविरोध निवडून आले होते. सलग दुसऱ्यांदा ही निवडणूक बिनविरोध झाली. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने सर्वांनी बिनविरोध निवडीसाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले होते.

हर्षवर्धन पाटील यांच्या आवाहनास इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी प्रतिसाद देत ही निवडणूक बिनविरोध केली होती. आज याबाबत चेअरमनपदाची निवड करण्यात आली. हर्षवर्धन पाटील यांच्या नावाचा ठराव एकमताने आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

हा कारखाना इंदापूर तालुक्यातील एक महत्त्वाचा घटक असून अनेक शेतकरी, कामगार, तोडणी वाहतूकदार तसेच अनेक व्यवसाय यावर अवलंबून आहेत. या निवडणुकीच्या यानिमित्ताने इंदापूर तालुक्यातील सहकारी संस्थांवर हर्षवर्धन पाटील यांचे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!