हवेलीत खरेदी-विक्री संघाची निवडणूक ‘खटक्यावर बोट’; ३०४ प्रतिनिधी मतदानाला, तालुका कामाला; तालुका नेतृत्वाची कसोटीवर प्रतिष्ठा पणाला..!!


जयदिप जाधव.                                       उरुळीकांचन : हवेली तालुक्यातील सहकार क्षेत्रातील तालुका खरेदी विक्री संघाची केवळ ३०४ मतदार प्रतिनीधी मतदार असलेल्या संस्थेची निवडणुक स्थानिक सहकारातील बदलत्या राजकीय समीकरणाच्या नांदीने तालुक्यावर लादली जात आहे का? असा तयारीचा वेग तालुक्यात पडलेल्या दोन राजकीय गटांमुळे निर्माण झाला आहे.तालुक्यात खरेदी- विक्री संघात अतिशय अल्प मतदार असलेल्या या संस्थेवर सहकारात काम करीत असलेल्या बड्या नेत्यांच्या संदोपंदीमुळे अटळ झाली असून निवडणुकीत माघारीपूर्वीच एकमेकांना अस्मान दाखविण्याचा आव्हानाने ‘बूंद से नही गयी ओ हौद से नही आयगी’ अशा प्रकारे तालुक्यात प्रतिष्ठेची ठरु लागली आहे.

 

हवेली तालुक्यात खरेदी विक्री संघाची मर्यादा ही सहकारात अस्तित्व शोधण्यापासून ते मर्यादीत राजकीय व्यवस्थेची सोय म्हणून पदे मिरविण्यात करण्यात येत होती. मात्र तालुक्यात बदलत्या घडामोडींत या संस्थेची निवडणूक लागेल असा स्वप्नातही न वाटणाऱ्या या संस्थेच्या सभासद असलेल्या तालुका कृषी पणन पणन संस्था(सोसायटी) व वैद्यकीय सभासद असलेल्या मतदारांना पडला आहे. या संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यात सहकारातील ‘राजकीय’ वार काढण्यासाठी तालुक्यात दोन गट असुसले आहेत असा प्रश्न तालुक्यात एकूण निवडणुकीच्या तयारीने पुढे आला आहे.

 

हवेली तालुक्यात सहकार क्षेत्रातील पुणे (हवेली) बाजार समिती वयशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखंड २३ वर्षाचे प्रशासकीय राजवट हटवून तालुक्याने मुंबई उच्च न्यायालयात दाद माघवून लावली आहे. या लढ्यात हेच तालुक्यात सहकार क्षेत्रात काम करणारे मान्यवर लढत होते.मात्र राजकारणात ‘कोण कोणाचा कायमचा मित्र’ व ‘कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो’याची प्रचिती तालुक्यात बदलत्या समिकरणाने झाली आहे.

 

तालुक्यातील बाजार समिती व कारखान्यात एकत्र असलेले नेते ‘कालचे शत्रू व आजचे मित्र’ झाल्याने खरेदी विक्री संघाची निवडणूक एका वेगळा टोकावर गेल्याने निवडणुकीचे वारे बिनविरोधाच्या प्रस्तावापूर्वी घुमू लागले आहेत. या संघात केवळ ३०४ मतदारसंख्या असलेल्या अंतिम यादीत तब्बल ६४ अर्ज दाखल झाले आहेत.या अर्जांत दोन्ही गटांत अतिशय दिग्गज नेते उतरल्याने इच्छुकांनी उमेदवारी माघारीच्या १२ नोंव्हेंबर या अंतिम मुदतीपूर्वीच तालुक्यात बैठका व गाव दौऱ्यांनी वातावरण ढवळून काढले आहे.

नेतृत्व सिध्द करण्याची कसब !
हवेली तालुक्यात सहकार क्षेत्रात आपली राजकीय कमांड सिद्ध करण्यासाठी सहकार क्षेत्रातील नेत्यांची पूर्ण कसब पणाला लागली असून या निवडणुकीत जिल्हा बँकेचे संचालक, बाजार समिती संचालक,कारखाना संचालक या निवडणुकीत दोन गटांत विभागले आहेत. तालुक्यातील आपली राजकीय प्रतिष्ठा हाच एकमेव मुद्दा निवडणूकीत असल्याने नेतृत्व सिध्द करण्याचा कसोटीवर तालुका कोणाच्या पाठिशी उभा राहतो या गोष्टीचा उलगडा मतदार करणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!