शिंदवणेत उपकेंद्रासाठी शिंदवणेकरांनी उपसले उपोषणाचे हत्यार! माजी सरपंच गणेश महाडिक यांच्या बेमुदत उपोषण तिसऱ्या दिवशी वाढता पाठिंबा…


उरुळी कांचन : वळती उपकेंद्रावर निर्माण होणारा अतिरिक्त दाब व थेऊर- वळती वाहिनीचा सातत्याने होणारा खंडीतपणामुळे या वाहिनीवरील शिंदवणे, तरडे वळती व सोरतापवाडी परिसरात विजेचा होणारा लपंडाव शेतकरी,नर्सरी उद्योगाला असह्य झाल्याने अनेक वर्षांच्या या भिजत असलेल्या प्रश्नावर शिंदवणे माजी सरपंच गणेश महाडीक यांनी शिंदवणे परिसरात स्वतंत्र वीज उपकेंद्रासाठी (दि.५) पासून बेमुदत उपोषण चालू केले आहे.

शेतकऱ्यांना वीजेचा प्रचंड मनस्ताप होत असताना कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत पुरंदर उपसा योजनेतून पत्र व्यवहार करुन जागा उपलब्ध करुन देत नसल्याने प्रशासना विरुध्द आंदोलन पेटले आहे. वळती उपकेंद्रावर अतिरीक्त दाब व वाहिनीचा नादुरुस्तपणाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. अनेकवर्षापासून या केंद्राचा प्रश्न सुटत नाही तर दुसरीकडे उपकेंद्रास पुरंदर उपसा योजनेच्या अखत्यारीत जागा उपलब्ध करुन देत नसल्याने हा प्रश्न भिजत पडला आहे. पाणी असून वीज नाही व विजेअभावी शेतकऱ्यांची फरफड हे समिकरण सुटत नसल्याची स्थिती आहे.

मुठा कालवा भरुन वाहुनही उन्हाळी हंगामात शेतीचा वीज पुरवठ्याअभावी शेतकरी त्रस्त झाला आहे. दुसरीकडे या परिसरात असलेल्या नर्सरी उद्योगाला वीजेचा फटका बसत आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवणे क्रमप्राप्त असताना आड असुन पाणी नाही अशी आवस्था आहे. या ठिकाणी वळती उपकेंद्रालगत जागा उपलब्ध करुन नवीन उपकेंद्रासाठी मागणी अनेकवर्षाची असल्याने जागेचा व उपकेंद्राचा पत्रव्यवहाराला कंटाळून स्वतंत्र वीज उपकेंद्रासाठी गणेश महाडीक यांचे सलग तिसऱ्या दिवशी उपोषण सुरू आहे.

जमिनीच्या भाडेप्रश्नी उपकेंद्राचा प्रस्ताव रखडला!

उपोषणकर्ते गणेश महाडिक यांनी सांगितले की, शिंदवणे गावची गायरान जमीन पुरंदर सिंचन उपसा योजनेसाठी देण्यात आली होती. त्यानंतरही या जमिनीतील काही क्षेत्र शिल्लक असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तत्कालीन काळात ही जमीन महावितरणच्या विद्युत उपकेंद्रासाठी देण्यात आली होती. मात्र, आता कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून महावितरणने संबंधित जमीन वार्षिक सहा लाख रुपये भाडेतत्त्वावर घ्यावी, अशी भूमिका मांडली जात आहे. दुसरीकडे, महावितरण प्रशासनाकडून एक रुपया नाममात्र दराने जमीन उपलब्ध झाल्यास उपकेंद्र उभारण्याची तयारी दर्शविण्यात येत असल्याचे महाडिक यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!