दिवाळी 2026: लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता? पूजा कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती..


पुणे : दिवाळीच्या सणाची चाहूल लागली असून घरोघरी सणाच्या तयारीला वेग आला आहे. घराची स्वच्छता, आकर्षक रांगोळ्या, दिव्यांची सजावट आणि फराळाची लगबग सुरू झाली आहे. आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय दिवसाची. हिंदू धर्मात दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान गणेश आणि कुबेर देव यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे.

धार्मिक मान्यतेनुसार, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विधिवत पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते, धन-धान्यात वाढ होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे यंदा दिवाळी कोणत्या दिवशी आहे, लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे आणि पूजा नेमकी कशी करावी, याबाबत जाणून घेऊया.

दिवाळी 2026 तारीख आणि लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी कार्तिक अमावास्येला दिवाळी साजरी केली जाते. यंदा कार्तिक अमावास्या तिथी 8 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजून 27 मिनिटांनी सुरू होणार असून 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजून 31 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे यंदा रविवार, 8 नोव्हेंबर 2026 रोजी दिवाळी साजरी केली जाणार आहे.

लक्ष्मीपूजनासाठी संध्याकाळी 5 वाजून 54 मिनिटांपासून रात्री 7 वाजून 50 मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त देण्यात आला आहे. या शुभ वेळेत कुटुंबीयांनी एकत्र येऊन माता लक्ष्मी, भगवान गणेश आणि कुबेर देव यांचे पूजन करावे.

लक्ष्मीपूजनासाठी कोणते साहित्य आवश्यक?
लक्ष्मीपूजन करण्यापूर्वी पूजेसाठी लागणारे साहित्य तयार ठेवणे आवश्यक आहे. यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाच्या मूर्ती, पूजेची चौकी, लाल वस्त्र, रोळी, कुंकू, चंदन, अक्षता, पान, सुपारी, पंचामृत, नारळ आणि गंगाजल यांचा समावेश आहे.

तसेच कलश, आंब्याची पाने, मौली, जानवे, फुले, फळे, दूर्वा, धूप, कापूर, दिवे आणि कापसाच्या वातीही ठेवाव्यात. माता लक्ष्मीला अर्पण करण्यासाठी खील, बताशे आणि मिठाईची व्यवस्था करावी.

दिवाळीला लक्ष्मी-गणेश पूजन कसे करावे?
– सर्वप्रथम घराची आणि पूजेच्या जागेची स्वच्छता करावी. दिवे आणि आकर्षक रोषणाईने घर सजवावे.
– पूजेसाठी चौकी मांडून त्यावर स्वच्छ लाल वस्त्र अंथरावे.
– चौकीवर माता लक्ष्मी, भगवान गणेश आणि कुबेर देव यांच्या मूर्ती किंवा छायाचित्रांची स्थापना करावी.
– देवांसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून सर्वप्रथम भगवान गणेशाचे स्मरण करावे.
– त्यानंतर रोळी, अक्षता, फुले, फळे, धूप, दीप आणि मिठाई अर्पण करून माता लक्ष्मी व भगवान गणेशाची पूजा करावी.
– पूजेदरम्यान माता लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करावा.

पूजेच्या शेवटी करावी आरती
लक्ष्मीपूजनाच्या शेवटी सर्व देवी-देवतांची आरती करावी. त्यानंतर कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी, आनंदी जीवनासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी प्रार्थना करावी. अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने आणि श्रद्धेने लक्ष्मीपूजन करून दिवाळीचा सण आनंदात साजरा करता येईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!