सोरतापवाडीत महिला उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी व्यावसायिक बाजारपेठ; ‘पारंबी कलादालना’त ग्रामस्थांनी महिलांना प्रोत्साहन देण्याची दिली साक्ष..


उरुळीकांचन : महिलांना आत्मनिर्भर व स्वावलंबी नारी घडविण्याच्या मूळ प्रेरणेने महिलांना हक्काचे व्यावसायिक व्यासपीठ मिळावे या उद्देशाने सोरतापवाडी (ता.हवेली) येथील जेके फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘पारंबी कलादालन’ या महोत्सवाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत या महोत्सवात महिलांनी विक्रीसाठी उभे केलेल्या दालनात सुमारे २०लाख रुपयांची अर्थिक उलाढाल होऊन महिलांना प्रोत्साहन देण्याचा कौतुकास्पद उपक्रम संपन्न झाला आहे.

जेके फाऊंडेशनच्या वतीने सोरतापवाडी येथे ३१ ऑक्टो. व १ नोव्हें. या दरम्यान दोन दिवसीय पारंबी कलादालन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. जेके फाऊंडेशनच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी आयोजित केलेल्या या कलादालनाचे उद्घाटन आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते करण्यात आले होते.

या कलादालनात गावातील गृह उद्योजक महिलांसाठी एक व्यावसायिक बाजारपेठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने व्यावसायिक बाजारपेठ निर्माण करण्यात आली होती. या बाजारपेठत कपडे, खाद्यपदार्थ, ज्वेलरी, वस्तूंचे दालन उभे केले होते. या दालनात गावातील गृह उद्योजक महिलांनी प्रतिसाद देत साहित्यांची विक्री करीत धाडसाने व्यावसायिक बनण्याचा संकल्प केला.

या कलादालनात ९० दालने उभे करीत गावातील गृह उद्योजक महिलांनी सहभाग घेतला तर पंचक्रोशीतील २० दालने या उपक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत या कलात्मक वस्तू खरेदी करण्यासाठी झुंबड उडविली होती.तर महिलांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थ दालनात शाकाहारी, मांसाहारी खवय्यांना आनंद घेतला.

या महिला प्रोत्साहन कार्यक्रमात महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हवेली पं. स.सभापती युवराज काकडे, उपसभापती विद्याताई गायकवाड,पं.स.सदस्य कृषीराज चौधरी,पुरोगामी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब चोरघे, पुणे बाजार समितीचे माजी उपसभापती तानाजी चौधरी तसेच मान्यवर उपस्थित होते. या कलामहोत्सवाचे आयोजन सुदर्शन चौधरी व उद्योजिका शितल चौधरी यांच्याकडून करण्यात आले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!