लोणीकाळभोर पोलिसांचा बेशिस्त वाहनावर कारवाईचा अनोखा उपक्रम ; लोणीस्टेशन चौकात धोकादायक वाहन चालकावर गुन्हा दाखल


लोणी काळभोर ; पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी स्टेशन चौकात वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा धोकादायक पद्धतीने वाहन उभे करणाऱ्या चालकाविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मस्तान बाबासाहेब शेख (वय ४२, रा. ससाणेनगर, हडपसर, पुणे) असे संबंधित चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार २३ ऑक्टोबरपासून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू आहे. त्यानुसार पोलीस पथक गस्त घालत असताना दुपारी अडीचच्या सुमारास लोणी स्टेशन चौकाजवळ मारुती सुझुकी कंपनीचे कॅरिअर वाहन महामार्गालगत धोकादायक स्थितीत उभे असल्याचे आढळले.

पोलिसांनी चालकाचा शोध घेतला असता मस्तान शेख हा वाहनाजवळ आला. कामगारांना घेण्यासाठी वाहन थांबविल्याचे त्याने सांगितले. मात्र, सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणे वाहन उभे केल्याने इतर वाहनचालकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, असे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पूजा विष्णू माळी यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामार्गावर बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!