अर्णब चक्रीवादळाचा हाहाकार! 100 रेल्वे गाड्या, 21 विमानांची उड्डाणे रद्द, 20 जिल्ह्यांना पावसाचा इशारा..

पुणे : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे ‘चक्रीवादळ अर्नब’ अधिक तीव्र झाल्यामुळे आर.के. बीचवर जोरदार वारे वाहत आहेत आणि समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. आज दुपारनंतर आंध्र प्रदेशातील बापटला आणि विशाखापट्टणमदरम्यान यानमजवळ किनाऱ्याला धडकणार आहे. अर्णब चक्रीवादळाचा तडाखा उत्तर चेन्नईला बसला आहे.

उत्तर चेन्नई भागात समुद्राचे पाणी अचानक मोठ्या प्रमाणात शिरल्याने किनारी रस्ते आणि संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. या तीव्र चक्रीवादळाचे केंद्र किनारपट्टीच्या अगदी जवळ असून, पुढील काही तासांत ते पूर्णपणे जमिनीवर धडकण्याची प्रक्रिया सुरू राहील. बंगालच्या उपसागरात तयार झालेले अर्णब हे अतितीव्र चक्रीवादळ समुद्राच्या पाण्याचा वेग जास्त आहे.
यामुळे वाहतूक व्यवस्थाही पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. रस्त्यांवरून जाणाऱ्या नागरिकांवर आणि वाहनांवर समुद्राच्या जोरदार लाटा थेट धडकत असल्याचं चित्र आहे. आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे अर्णब चक्रीवादळ धडकल्यानंतर, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आणि वीजवाहिन्या तुटल्या. अनेक रस्ते अजूनही पाण्याखाली आहेत.


अग्निशमन विभागाने सांगितले की, सध्या बचाव कार्य सुरू आहे. चक्रीवादळामुळे पूर्व मेदिनीपूरमधील दिघा बीचवर समुद्र खवळलेला असून, जोरदार वारे वाहत आहेत. नागरिकांना सुरक्षिततेसाठी घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मोहाना येथे, ‘चक्रीवादळ अर्नब’च्या तडाख्यामुळे पडलेली झाडे अग्निशमन दलाने हटवली.
विमानांच्या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने २७ ऑक्टोबर रोजी प्रवासविषयक सूचना जारी करून प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रतिकूल हवामानामुळे विमानांच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो. यामुळे 100 रेल्वे गाड्या, 21 विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ईशान्य महाराष्ट्रात देखील याचा इशारा देण्यात आला आहे.
