पुणे पदवीधर निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! सगळी यंत्रणा कामाला लावूनही झाला मोठा पराभव, शरद पवारांची जादू कायम…


पुणे : राज्यात पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद निवडणुकीतच निकाल कालपासून जाहीर होत असून अजूनही मतमोजणी सुरु आहे. असे असताना पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होऊन २४ तास उलटल्यानंतरही दोन्ही मतदारसंघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे.

पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी आघाडी घेतली, तर शिक्षक मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे कौस्तुभ गावडे सध्या आघाडीवर आहेत. दोन्ही मतदारसंघांतील विजयासाठी आवश्यक असलेला कोटा जाहीर होण्यास रात्री उशीर झाला. यामुळे निकालाला देखील उशीर होत आहे.

पदवीधर मतदारसंघात २,२६,२२४ मते वैध ठरली असून, विजयासाठी १,१३,११३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. हर्षदा देशमुख-जाधव आणि भारतीय जनता पक्षाच्या स्मिता जाधव यांच्यात काट्याची टक्कर आहे. मतमोजणीदरम्यान पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये हर्षदा यांनी आघाडी घेतल्याचे चित्र होते.

पुणे पदवीधरमध्ये भाजपला हा मोठा धक्का असून भाजपने राष्ट्रवादीच्या मदतीने सगळे आमदार मंत्री याठिकाणी कामाला लावले होते. यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. महायुतीच्या जागावाटपात भाजपने पुणे पदवीधर आणि शिक्षक हे दोन्ही मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्याचा आग्रह धरला होता.

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाचे भाजप उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात गावडे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या तुलनेत अधिक मते मिळवली. मात्र, विजयासाठी आवश्यक असलेला कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना आणखी मतांची गरज आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!