लवासा झाला तेव्हा वृक्षतोड झाली नाही का? सदाभाऊ खोत यांचा विरोध करणारांना सवाल, म्हणाले चीन आपल्यापेक्षा…

पुणे : राज्यात सध्या टोरंट प्रकल्पावरुन मोठा गोंधळ निर्माण झालं आहे. या टोरंट प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. कर्जतमधील भीमा शंकरच्या जंगलात आतापर्यंत 2 हजार झाडे तोडल्याचा दावा करण्यात येत आहे. राज्यातील विरोधी पक्षांसह पर्यावरण प्रेमी या वृक्ष तोडीवर संताप व्यक्त करत आहेत. तसेच आंदोलनं सुरु आहेत.

असे असताना सदाभाऊ खोत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, राज्यात उद्योग आला की विरोध, बाहेर गेला की विरोध. राज्याला वीजेची गरज आहे. जी वृक्षतोड होणार ती झाडे लावली जाणार, चीन पुढे जात आहे आपल्यापेक्षा, टोरंटप्रकरणी सरकारने खंबीर राहावं” असं सदाभाऊ खोत म्हणाले.
तसेच ”लवासा झाला तेव्हा वृक्षतोड झाली नाही का? धरणं होताना वृक्षतोड होत नाही का ? प्रकल्पाला विरोध करण्याचं काम नाही. सध्या अनेक नेते याठिकाणी भेटी देत आहेत. येत्या 28 तारखेला राज ठाकरे कर्जतमध्ये जाणार असून तिथे ते सभा घेणार आहेत. टोरंट प्रकल्प नको अशीच सर्वांची भूमिका आहे.


सध्या टोरंट प्रकल्पाच्या वृक्ष तोडीवरुन राज्यात प्रचंड संताप आहे. एक मोठं आंदोलन उभं राहण्याच्या तयारीत आहे. पण शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांची वेगळी भूमिका आहे. तसेच माधुरी मिसाळ म्हणाल्या, वीज ऊत्पादनासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. प्रकल्प आला तर अनेक जिल्ह्यातील तालुक्यातील वीजेचा प्रश्न मार्गी लागेल, रोजगार मिळेल.
तसेच यासाठी विरोधकांची मनधरणी करण्याचा प्रसत्न करू, पर्यावरणवाद्यांना आमचं सांगणं आहे की सरकारवर विश्वास ठेवा. सरकारची विकास करण्याची मानसिकता आहे. कोस्टल, अटल सेतू , समृद्धी हायवे हे सगळे विकासानंतर लोकांच्या वापरात आले तसंच या प्रकल्पाचही होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
