मतमोजणीआधीच पुण्यात राडा! सात ते आठ मतपेट्यांच सील तुटलेलं, ते मतदान कोणाचं?


पुणे : राज्यात आज शिक्षक आणि पदवीधर मतदानाची मतमोजणी होणार आहे. यामुळे याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. असे असताना पुणे विभागात एक धक्क्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाला. निवडणूक अधिकारी आणि मतदार प्रतिनिधीमध्ये वादावादी झाली.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रतिनिधीने मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतला. त्यांनी आमच्या तक्रारीला अर्थ नाही. सगळ्या उमेदवारांनी आक्षेप घेतला. सात ते आठ मतपेट्यांच सील निघालेलं होतं, असुदे म्हटले आहे. यामुळे काहीकाळ मतमोजणी देखील थांबली आहे.

अधिकारी तिथे आले. त्यांनी बघितलं. प्रोसीड म्हणाले. सात ते आठ मतपेट्यांच सील तुटलेलं. ते कोणाचं मतदान आहे माहिती नाही. ते परमेश्वराला, मतदार राजाला माहितीय. मतपेटीचं सील तुटणं ही गंभीर बाब आहे. त्या सील तुटलेल्या पेट्या बाजूला ठेऊन मतमोजणी करावी. सात ते आठ मतपेट्यांच सील तुटलेलं आहे. असेही त्यांनी सांगितलं आहे.

तसेच या सील तुटलेल्या मतपेट्या बाजूला ठेऊन पारदर्शकपणे मतमोजणी कराव, अशी हर्षदा देशमुख यांच्या प्रतिनिधीची मागणी आहे. पदवीधरमध्ये मतदान करणारे सुशिक्षित, उच्चशिक्षित मतदार असतात. त्यामुळे या निकालाकडे सगळ्यांच लक्ष असेल. पुणे शिक्षकची जागा जास्त चर्चेत राहिली. याठिकाणी भाजपकडून मोठ्या प्रमाणावर पैसे वाटल्याचे आरोप होत आहेत.

दरम्यान, पुण्यात पदवीधरमध्ये मुख्य लढत भाजपच्या डॉ. स्मिता योगेश जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्यामध्ये आहे. ठाकरे गटाकडून सुनील मोदी रिंगणात आहेत. यामुळे दुपारपर्यंत कौल हाती येईल. इतर ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर चुरस निर्माण झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!