‘सोमेश्वर’ला वहिनींत दादांचा राजकीय वारसा दिसला; आक्रमक बाणा स्वकीयांसह मित्रपक्षांनाही सूचक इशारा ठरणार काय?


जयदिप जाधव                                        उरुळीकांचन : पुणे जिल्ह्यात आपल्या राजकीय कार्यकिर्दीची ३५वर्षे खर्ची केलेले दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्ह्याच्या राजकारणावरील त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटूंबियांची पकड सैल होईल अशा राजकीय फाजील आत्मविश्वासात राहणाऱ्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीसह सर्व पक्षीय नेत्यांना सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणुक जळजळीत डोळ्यात अंजन घालणारी ठरली आहे.

सोमेश्वर कारखान्यातआपल्या नेतृत्वाचा खरा पैलू दाखविणाऱ्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांंनी आपले राजकीय कर्तूत्व व कौशल्य सिध्द केल्याने जिल्ह्यातील राजकीय ढगरीवर आपलीसोईस्कर राजकीय भूमिका असलेल्या राष्ट्रवादीसह सर्व पक्षीय नेतेमंडळींना त्यांनी सूचना इशारा दिला असून पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांचा आक्रमक बाणा जिल्ह्याची समीकरणे पुन्हा आपल्या हाती घेणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे.

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत पक्षाला अचानक स्वकियाकडून दगाफटका झाल्याने सुनेत्रा पवार यांनी ज्या पध्दतीने आक्रमक प्रचार करुन विरोधकांना गारद करण्याचे कसब दाखविल्याने त्यांच्या बदलत्या व अभ्यासू नेतृत्वाची चुणूक जिल्ह्याला पहायला मिळाली आहे. पुणे जिल्ह्यात दिवंगत अजित पवार यांनी बारामतीप्रमाणे जिल्ह्यातही अनेक चेहऱ्यांना राजकीय राजाश्रय मिळून दिला आहे.

अनेक बडी पदे बहाल केली आहेत. साखर कारखाने, दूध संस्था , जिल्हा परिषदा, बाजार समित्या व आमदारकी माध्यमातून काहींचा प्रवास राज्यपातळीवर झाला आहे. मात्र तेच कार्यकर्ते आता छुपी कुजबुज करुन राष्ट्रवादीत स्थीर राहावे, का म्हणून चाचपणी करु लागले आहे.

अजित पवार यांनी अनेक वर्षे सांभाळलेली मंडळी सध्या जिल्ह्यात सर्व पक्षीय व्यासपीठावर चाचपणी करू लागले असून राष्ट्रवादीत वाढूनच आता पक्षाच्या मुळावर उठण्याची कृती या राजकीय मंडळींकडून सुरू आहे. अशाच पध्दतीने पुणे जिल्हा बॅकेच्या संचालक मंडळाच्या आगामी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्यानंतर प्रथमच जिल्ह्यात बदलत्या राजकीय वाऱ्याचे परिणाम दिसू लागले आहे. आता ‘दादा’नाही म्हणून ही मंडळी दुसरीकडे राजकीय दरवाजे ठोठावू लागले आहेत. पहिल्यांदाच जिल्हा बॅकेच्या निवडणुकीला जिल्ह्यात सर्व पक्षीय नेते आपले हात फैलावू लागले असून जिल्हा बँकेवर जाण्याची स्वप्ने रंगवू लागली आहे.

परंतु आता मात्र सुनेत्रा पवार यांनी सोमेश्वर कारखान्यात आपली खरी कसब दाखविल्याने ढगरीवर असलेल्या नेतेमंडळींना सूचक इशारा मिळाला असून ‘दादा मोठ्या मनाचे होते, पण मी नाही’ या इशाऱ्यात सर्व काही दडले आहे. एक महिला ‘प्रसंगी संयम बाळगू शकते’ व ‘प्रसंगी दूर्गेचा आवतार घेऊ शकते’ अशी कृतीच त्यांनी दाखविल्याने जिल्ह्याच्या नेतेमंडळींना हा निकाराचा इशारा ठरु शकणार असून त्यांच्या सोमेश्वर कारखान्याच्या संपूर्ण निर्णय प्रक्रियेने त्यांनी ठळक कृती अधोरेखित केल्याने जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचे धैर्य त्यांच्याकडे दाखवून दिले आहे.

जिल्हा बँकेत गोकुळचा फॉर्म्युला राबविणार?

पुणे जिल्ह्यातील सत्तेतील सर्व काही निर्णय सुनेत्रा पवार याच घेतील हे निश्चित झाले आहे. सोमेश्वर कारखान्यात पॅनलची चूल वेगळी मांडण्यात सुरुवीतीपासूनच आग्रही असलेल्या विजय शिवतारेंना सुनेत्रा पवार यांच्याशी एकत्र येण्याचे वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निर्णय व पुणे जिल्हा बँकेची आगामी निवडणुक ही सत्तेतील पक्ष एकत्र येऊन गोकुळ दूध संघाप्रमाणे सामोरे जाण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!