पंतप्रधान मोदींच्या बारामती दौऱ्याची तारीख बदलली, शरद पवारांनी स्वतः दिली माहिती, आता 3 नोव्हेंबरला पंतप्रधान बारामतीला येणार..


बारामती : राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत असताना चर्चेत असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा निश्चित झाला आहे. याआधी मोदी 24 ऑक्टोबरला बारामतीला येणार होते. पण यामध्ये आता बदल झाला असून याबाबत शरद पवार यांनी माहिती दिली आहे. आता मोदी 3 नोव्हेंबरला येणार आहेत.

पंतप्रधान मोदी विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन करणार आहेत. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) संस्थेची पाहणी आणि त्याबाबतचे सादरीकरणही पंतप्रधानांसमोर होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच काही महत्त्वाचे कंपन्या यांना निमंत्रण दिले आहे.

मायक्रोसॉफ्टचे प्रमुख यांनी निमंत्रण स्वीकारले आहे. सुप्रिया सुळे, पार्थ पवार यांना निमंत्रण दिले आहे. सिरमचे प्रमुख सायरस पुनावाला, बाबा कल्याणी, विजय शिर्के, अनिल काकोडकर यांना निमंत्रण दिलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बारामतीत यावं अशी विनंती केली होती. तो कार्यक्रम पुढं ढकलला आहे. काल प्रधानमंत्री यांच्या कार्यालयाने आपल्याला पाठवलं आहे.

3 नोव्हेंबरला मोदी बारामतीत येतील. 10 वाजता सकाळी विमानतळवरती येतील. त्यानंतर विद्या प्रतिष्ठान येथे येतील, अशी माहिती शरद पवारांनी दिली आहे. प्रेरणास्थळ येथे गौतम बुद्ध यांचा पुतळा बसवलेला आहे. त्याचे वजन 4 टन आहे. बुद्धाची हस्त मुद्रा आहे, हस्तमुद्रा याचा अर्थ काय आहे, याची माहिती तिथं दिली आहे.

अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, आण्णाभाऊ साठे, यशवंतराव चव्हाण, शरदबाई पवार यांचे पेंटिंग आहे. त्याची उंची 5.9 आहे, अशी माहिती देखील शरद पवारांनी दिली आहे. याची पाहणी मोदी करणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!