ऑक्टोबरमध्ये तब्बल १६ दिवस बँकांचे कामकाज राहणार बंद; दसरा, दुर्गापूजेसह अनेक सणांमुळे सुट्ट्याच सुट्ट्या, पाहा संपूर्ण यादी..

मुंबई : ऑक्टोबर २०२६ मध्ये अनेक सण आणि राष्ट्रीय सुट्ट्यांमुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. गांधी जयंती, दुर्गापूजा, दसरा आणि इतर सणांनिमित्त विविध राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत. याशिवाय रविवार आणि महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारची सुट्टीही असणार आहे. त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
ऑक्टोबरमध्ये कोणते सण आणि सुट्ट्या आहेत?
ऑक्टोबर महिन्यात महात्मा गांधी जयंती, महालया अमावस्या, दुर्गापूजा, महा सप्तमी, महाअष्टमी, महानवमी, विजयादशमी, आयुध पूजा, करवा चौथ आणि सरदार वल्लभभाई पटेल जयंती असे विविध सण आणि महत्त्वाचे दिवस साजरे केले जाणार आहेत. या सणांनिमित्त वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँकांना सुट्ट्या असतील.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमानुसार, देशातील बँकांना प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. तसेच रविवारीही बँकांचे कामकाज बंद असते. याशिवाय विविध राज्यांतील सण आणि स्थानिक सुट्ट्यांनुसार बँका बंद राहतात.


ऑक्टोबर २०२६ मधील बँकांच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी
– २ ऑक्टोबर २०२६ : महात्मा गांधी जयंतीनिमित्त देशभरातील सर्व बँका बंद राहतील.
– ४ ऑक्टोबर २०२६ : रविवार असल्याने देशभरातील बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
– १० ऑक्टोबर २०२६ : महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील. तसेच कर्नाटक आणि कोलकाता येथे महालया अमावस्येनिमित्तही सुट्टी असेल.
– ११ ऑक्टोबर २०२६ : रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.
– १७ ऑक्टोबर २०२६ : त्रिपुरामध्ये महा सप्तमीनिमित्त बँका बंद राहतील.
– १८ ऑक्टोबर २०२६ : रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.
– १९ ऑक्टोबर २०२६ : दुर्गापूजा, महाअष्टमी आणि महानवमीसह विविध सणांनिमित्त त्रिपुरा, मिझोराम, ओडिशा, तामिळनाडू, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि मेघालय येथे बँका बंद राहतील.
– २० ऑक्टोबर २०२६ : दसरा, विजयादशमी, महानवमी आणि आयुध पूजेनिमित्त विविध राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल.
– २१ ऑक्टोबर २०२६ : विजयादशमी आणि दुर्गापूजा (दसाईं) निमित्त त्रिपुरा, कर्नाटक, सिक्कीम, आसाम, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये बँका बंद राहतील.
– २२ ऑक्टोबर २०२६ : सिक्कीममध्ये दुर्गापूजा (दसाईं) निमित्त बँकांचे कामकाज बंद राहील.
– २३ ऑक्टोबर २०२६ : सिक्कीममध्ये दुर्गापूजा (दसाईं) निमित्त बँका बंद राहतील.
– २४ ऑक्टोबर २०२६ : महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.
– २५ ऑक्टोबर २०२६ : रविवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
– २६ ऑक्टोबर २०२६ : लक्ष्मीपूजा, महर्षी वाल्मीकी जयंती आणि ॲक्सेशन डेनिमित्त त्रिपुरा, चंडीगड, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात बँका बंद राहतील.
– २९ ऑक्टोबर २०२६ : हिमाचल प्रदेशात करवा चौथनिमित्त बँका बंद राहतील.
– ३१ ऑक्टोबर २०२६ : गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी असेल.
बँका बंद असल्या तरी ऑनलाइन व्यवहार सुरू राहणार
बँकांना सुट्टी असली तरी ग्राहकांना बहुतांश डिजिटल बँकिंग सेवांचा वापर करता येणार आहे. इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग ॲप आणि UPI च्या माध्यमातून पैसे हस्तांतरित करणे, बिल भरणे आणि खात्यातील व्यवहारांची माहिती मिळवणे यांसारखी कामे करता येतील. मात्र, रोख रक्कम जमा करणे, धनादेशाशी संबंधित काही कामे आणि बँकेच्या शाखेतून होणाऱ्या सेवांसाठी कामकाजाच्या दिवशीच जावे लागेल.
