घरातलं पीठ संपलं म्हणून शेजाऱ्याकडे मागायला गेली; पण त्याने घरात ओढलं अन्… पुण्यात १२ वर्षीय मुलीसोबत भयंकर कृत्य


पुणे : पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेजारी राहणाऱ्या ५२ वर्षीय व्यक्तीने मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली आहे.

जयसिंग साठे (वय ५२, रा. विश्रांतवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पुणे महापालिकेत कंत्राटी स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत असल्याची माहिती आहे.

पीठ मागण्यासाठी गेली अन् अत्याचाराचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या कुटुंबासह विश्रांतवाडी परिसरात राहते. १२ सप्टेंबर रोजी घरात पीठ संपल्याने ती शेजारी राहणाऱ्या आरोपीच्या घरी पीठ मागण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने तिला घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

धमकी दिल्याने घाबरली

अत्याचारानंतर आरोपीने हा प्रकार कोणाला सांगू नये, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने काही काळ हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र, नंतर तिने धाडस करून आईला संपूर्ण घटना सांगितली.

यानंतर मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर बलात्काराचे कलम तसेच पॉक्सो कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार आरोपीवर कारवाई करण्यात आली.

“मुलीच्या आईने २२ सप्टेंबर रोजी तक्रार दिल्यानंतर त्याच दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला. वैद्यकीय अहवाल प्राप्त होताच बलात्काराचे कलम आणि पॉक्सो कायद्यातील तरतुदींनुसार आरोपीवर कारवाई करून त्याला अटक करण्यात आली आहे,” अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत यांनी दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!