पुणेकरांनो, आज घराबाहेर पडण्याआधी हे वाचा! गणेश विसर्जनामुळे ‘हे’ प्रमुख रस्ते बंद..


पुणे : पुणे शहरात आज गणेश विसर्जन मिरवणुका काढण्यात येत असल्याने मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी शहराभोवती वर्तुळाकार पर्यायी मार्गाची व्यवस्था केली आहे. मिरवणुकीच्या स्थितीनुसार शहरात येणारी वाहतूक विविध ठिकाणी अडवून पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.

शहरातील प्रमुख प्रवेशमार्गांवरील 10 ठिकाणी वाहतूक परिस्थितीनुसार बदल करण्यात आले आहेत. जंगली महाराज रस्त्यावरील झाशी राणी चौक, शिवाजी रस्त्यावरील काकासाहेब गाडगीळ पुतळा, मुदलियार रस्त्यावरील अपोलो टॉकीज-दारुवाला पूल, लक्ष्मी रस्त्यावरील संत कबीर पोलिस चौकी, सोलापूर रस्त्यावरील ढोले चौक (सेव्हन लव्हज), सातारा रस्त्यावरील वीर बाजी पासलकर चौक (व्होल्गा चौक), बाजीराव रस्त्यावरील सावरकर पुतळा चौक, लालबहादूर शास्त्री रस्त्यावरील सेनादत्त पोलिस चौकी, कर्वे रस्त्यावरील नळ स्टॉप आणि फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील गोखले चौक येथे शहरात येणारी वाहतूक अडवण्यात येणार आहे.

असा असेल वर्तुळाकार पर्यायी मार्ग

कर्वे रस्ता जंक्शन → नळ स्टॉप → लॉ कॉलेज रस्ता → सेनापती बापट रस्ता → गणेशखिंड रस्ता → भाऊसाहेब खुडे चौक (सिमला ऑफिस) → संचेती हॉस्पिटल → COEP → शाहिर अमर शेख चौक → मालधक्का → नरपतगिरी चौक → नेहरू रस्ता → संत कबीर पोलिस चौकी → ढोले चौक → वखार महामंडळ चौक → शिवनेरी रस्ता → गुलटेकडी → मार्केट यार्ड जंक्शन → सातारा रस्ता → व्होल्गा चौक → मित्रमंडळ चौक → सिंहगड रस्ता → सावरकर चौक → लालबहादूर शास्त्री रस्ता → सेनादत्त पोलिस चौकी → म्हात्रे पूल → नळ स्टॉप.

या संपूर्ण मार्गावर 25 सप्टेंबरपासून गणेश विसर्जन मिरवणुका पूर्ण होईपर्यंत दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे.

गणेश विसर्जनाच्या काळात मध्यवर्ती पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!