घराची चावी सापडली नाही म्हणून पत्नीला बेदम मारहाण! नाका-तोंडातून रक्त, अखेर १९ वर्षीय महिलेचा मृत्यू; नाशिकमध्ये खळबळ


नाशिक : नाशिकच्या बजरंगवाडी परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका २१ वर्षीय तरुणाने आपल्या १९ वर्षीय पत्नीची निर्घृण हत्या केली आहे.

घराची चावी सापडत नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून आरोपीनं पत्नीला बेदम मारहाण करत तिचा खून केला आहे. या प्रकरणी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इद्रीस मोहम्मद शेख असं गुन्हा दाखल झालेल्या २१ पतीचं नाव आहे.

नेमकी घटना काय?

पोलीस अंमलदार राजू शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बजरंगवाडी येथे राहणारी जरीना उर्फ नन्नी इद्रीश शेख (वय १९) ही महिला तिचा पती इद्रीस शेख याच्यासोबत वडाळा गाव येथे गेली होती. तेथे घराच्या आवारातच दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला.

या वादादरम्यान संतप्त इद्रीसने तिला अत्यंत अमानुषपणे बेदम मारहाण केली. त्यावेळी जरीनाच्या माहेरच्या लोकांनी हस्तक्षेप करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘कोणी मध्ये पडल्यास बघून घेईन,’ अशी धमकी संशयित इद्रीसने माहेरच्या लोकांना दिली.

त्यानंतर दोघेही बजरंगवाडी येथील आपल्या घरी परत आले. सोमवारी रात्री घराची चावी सापडत नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून इद्रीसने पुन्हा जरीनाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या मारहाणीमुळे जरीनाचा जोरात ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारील नागरिक मदतीसाठी धावून आले. नागरिकांनी घरात जाऊन पाहिले असता, जरीनाच्या नाका-तोंडातून आणि डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्त येत होतं.

शेजाऱ्यांनी मध्यस्थी करत तिला इद्रीसच्या तावडीतून सोडवले. मात्र, मारहाण इतकी गंभीर होती की उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे नाशिक परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!