१५ कोटींचा विषय, १ कोटी मागितले, गणरायाची पूजा सोडून तहसीलदार निघाला अन् अडकला, ५ हजार जणांचा प्रसाद तयार होत असताना अटक


धारवाड : धारवाडचे तहसीलदार सच्चिदानंद कुचनूर यांना लाच घेताना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तक्रारदाराकडे ३३ एकर जमीन आहे. यातील १३ एकर जागा शेतीसाठी योग्य नसल्याचं प्रमाणपत्र तक्रारदाराला हवं होतं. या जमिनीवर त्यांना रहिवासी बांधकाम करायचं होतं. त्यासाठी कुचनूर यांनी १ कोटी रुपयांची रोकड आणि १ एकर जमिनीची मागणी केली.

यामुळे एकच खळबळ उडाली असून याबाबत तपास सुरु आहे. याबाबत माहिती मिळताच लोकायुक्तांनी लावलेल्या सापळ्यात तहसीलदार अडकला आहे. ५० लाख रुपयांची लाच घेताना त्याला अटक करण्यात आली. याबाबत माहिती अशी की जमीन मालकानं या प्रकरणी लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार केली होती. अधिकाऱ्यांनी तक्रारदाराच्या साथीनं तहसीलदाराला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला.

तक्रारदाराने साडे पाच वाजता तहसीलदाराला भेटायला बोलावलं. पण आपण कामात असल्याचे तहसीलदाराने तक्रारदाराला सांगितले. तक्रारदाराची जमीन पुणे-बंगळुरू महामार्गाला लागून आहे. येरिकोप्पा गावात ही जमीन आहे. आयआयटी धारवाड आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाची उभारणी यानंतर जमिनीचा दर एकरामागे १.५ कोटींवर गेला.

यामुळे ही जमीन १५ कोटी रुपयांवर जाते. तहसीलदार कुचनूर यांनी तहसीलदार कार्यालयाच्या जवळ गणपती आणला होता. तिथे सत्य नारायण पुजेचं आयोजन करण्यात आलं होतं. येथे ५ हजार जणांसाठी प्रसादाचं जेवण केलं जात होतं. तक्रारदाराने त्यांना कॉल केला. ५० लाखांची रोकड बाळगणं जोखमीचे असल्याचे त्याने सांगितले.

नंतर कुचनूर पुजेची तयारी सोडून आले. धारवाडमधील कर्नाटक आर्ट्स कॉलेजात रात्री साडे आठच्या सुमारास पोहोचण्याच्या सूचना तहसीलदाराने तक्रारदाराला केल्या. ते पोहोचण्याआधीच लोकायुक्त पोलिसांनी सापळा रचला होता. तक्रारदाराकडून ५० लाख रुपयांची लाच घेताना कुचनूर यांना अटक झाली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!