पती, पत्नी अन् ‘ती’ शिक्षिका! रात्री उशिरापर्यंत चॅटिंग, संतप्त पत्नी थेट शाळेत; भरवर्गात रंगला हायव्होल्टेज ड्रामा…


अहिल्यानगर : श्रीरामपूर तालुक्यात एका प्राथमिक शाळेत घडलेल्या प्रकाराची सध्या परिसरात चर्चा सुरू आहे. पतीचे एका शिक्षिकेसोबत नियमित संभाषण आणि भेटीगाठी होत असल्याचा संशय आल्याने संतप्त पत्नी थेट शाळेत पोहोचली. शाळा सुरू असतानाच दोघींमध्ये वाद झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, बेलापूर परिसरातील एका तरुणाचे संबंधित प्राथमिक शाळेतील शिक्षिकेशी परिचयाचे संबंध होते. त्यांच्यातील वाढत्या संपर्कामुळे तरुणाच्या पत्नीला संशय आला. पतीच्या हालचालींवर लक्ष ठेवल्यानंतर त्याचे शिक्षिकेसोबत नियमित संभाषण आणि भेटीगाठी होत असल्याचे तिच्या लक्षात आल्याचा दावा करण्यात येत आहे.

शाळेत पोहोचताच पत्नीचा संताप

पती आणि शिक्षिकेच्या संबंधांबाबत संशय बळावल्यानंतर संतप्त पत्नीने थेट संबंधित शाळा गाठली. वर्गाबाहेर शिक्षिका दिसताच दोघींमध्ये जोरदार वाद झाला. यावेळी पत्नीने शिक्षिकेला जाब विचारल्याने शाळेच्या आवारात काही काळ गोंधळ निर्माण झाला.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात आल्यानंतर शिक्षिकेने तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.

ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी

शाळेच्या आवारात घडलेल्या या प्रकारानंतर परिसरात या घटनेची चर्चा सुरू झाली. संबंधित शिक्षिकेच्या वर्तणुकीबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत पुष्टी होणे आणि संबंधित प्रशासनाकडून नेमकी भूमिका स्पष्ट होणे बाकी आहे. त्यामुळे चौकशीनंतर या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर येणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!