रात्रीच्या प्रवासात कंडक्टरचा महिलेबाबत संतापजनक प्रकार; नको तिथे स्पर्श केल्यानंतर पाय पकडले अन्…,महाराष्ट्राला हादरवणारी घटना

नागपूर : नागपुरात एक खळबळजनक गोष्ट घडली आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करण्याऱ्या महिलेला मोठ्या धक्कादायक प्रसंगाचा समना करावा लागला आहे. तरुणीला लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागला.
नागपूर याठिकाणी रात्रीच्या बसप्रवासात प्रवाशी महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या खासगी कंडक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ७ सप्टेंबरच्या रात्री नागपूरहून बिंधिया येथे जाण्यासाठी एका खासगी बसने प्रवास करत होती. महिला बसमध्ये एकटीच प्रवास करत असल्याचा गैरफायदा बसच्या कंडक्टरने घेण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या वेळी बस ‘एमपी बस स्टँड’ परिसरात आली असताना ही घटना घडली.


तक्रारीत नमूद केल्यानुसार, महिला बसमध्ये एकटी असल्याचे पाहून कंडक्टरची नियत बिघडली. त्याने महिलेसोबत अत्यंत अश्लील आणि अयोग्य गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. महिलेच्या छातीला स्पर्श करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तसेच तिचे दोन्ही पाय पकडण्याचाही प्रयत्न केला.
दरम्यान, या प्रकरणी पीडित महिलेने सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. महिलेच्या दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी खासगी बस कंडक्टरविरुद्ध लैंगिक छळ आणि अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे खासगी बस प्रवासातील महिलांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोलीस आरोपी कंडक्टरचा शोध घेत असून पुढील तपास वेगाने करत आहेत.