गणेशोत्सवात सोनं खरेदीची सुवर्णसंधी! आज सोने-चांदीचे दर धडाधड घसरले; 24 कॅरेटचा भाव किती?


पुणे : देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. 24 कॅरेट सोन्याच्या दरात साप्ताहिक सुमारे 2 टक्क्यांची नरमाई नोंदवण्यात आली असून, 10 ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास 3,000 रुपयांनी कमी झाला आहे.

अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरासंदर्भातील वाढती चिंता आणि कच्च्या तेलाच्या दरातील तीव्र तेजीचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतींवर झाला आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव शुक्रवारी 1,51,938 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. मागील शुक्रवारी हाच दर 1,54,884 रुपये होता. म्हणजेच एका आठवड्यात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 2,946 रुपयांनी कमी झाला आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) देखील सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाला. शुक्रवारच्या सत्रात सोने 1,52,655 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले, तर चांदीचा दर 2,34,886 रुपये प्रति किलोवर राहिला.

MCX वर सोन्याचा 5 ऑक्टोबर 2026 चा कॉन्ट्रॅक्ट मागील क्लोजिंग 1,52,341 रुपयांच्या तुलनेत 1.03 टक्के म्हणजेच 1,571 रुपयांनी घसरून 1,50,770 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उघडला.

यानंतर सोन्याच्या दरात काहीशी सुधारणा झाली. सकाळी 9.48 वाजता सोने 867 रुपये म्हणजेच 0.57 टक्क्यांच्या घसरणीसह 1,51,474 रुपयांवर व्यवहार करत होते. दिवसभरात सोन्याने 1,50,695 रुपयांचा नीचांक आणि 1,51,474 रुपयांचा उच्चांक गाठला.

दरम्यान, 4 डिसेंबर 2026 चा चांदीचा कॉन्ट्रॅक्ट 1.08 टक्के म्हणजेच 2,530 रुपयांनी घसरून 2,31,569 रुपये प्रति किलोवर उघडला.

आजचा सोन्याचा भाव काय?

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) माहितीनुसार, सोमवार, 14 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,51,938 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

कॅरेट — आजचा सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम)

कॅरेटनुसार सोन्याचा आजचा दर (प्रति 10 ग्रॅम):

24 कॅरेट – ₹1,51,938
22 कॅरेट – ₹1,51,330
20 कॅरेट – ₹1,39,175
18 कॅरेट – ₹1,13,954
14 कॅरेट – ₹88,884

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा दर

मुंबई – ₹1,51,938
ठाणे – ₹1,51,938
रत्नागिरी – ₹1,51,938
पुणे – ₹1,51,938
नागपूर – ₹1,51,938
कोल्हापूर – ₹1,51,938
छत्रपती संभाजीनगर – ₹1,51,938
जळगाव – ₹1,51,938
सांगली – ₹1,51,938
बारामती – ₹1,51,938

चांदीचा भाव काय?

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) माहितीनुसार, सोमवार, 14 सप्टेंबर रोजी चांदीचा दर ₹2,28,920 प्रति किलोग्रॅम इतका आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!