पुण्यातील फ्लॅट नंबर ३१ मध्ये नेमकं काय सुरू होतं? २ महिला अन् १ पुरुष; अचानक पोलीस पोहोचले अन्…

पुणे : शिवणे-उत्तमनगर रस्त्यावरील साईश्रद्धा अपार्टमेंटमधील एका बंद फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीच्या प्रकाराचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTC) गुरुवारी (१० सप्टेंबर) फ्लॅट क्रमांक ३१ वर छापा टाकून एका पीडित महिलेची सुटका केली.
या कारवाईत पोलिसांनी एका पुरुषासह दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. पिंटू ग्यानदेव चव्हाण (वय ३८, रा. शिवणे), इंदू संतोष निखरे (वय ५२) आणि संनुदा नंदू लोहकरे (वय ४०, रा. नऱ्हे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.

गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा सापळा
साईश्रद्धा अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ३१ मध्ये देहविक्रीचा प्रकार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खात्री केल्यानंतर पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाईची तयारी केली.


गुरुवारी पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला संबंधित फ्लॅटवर पाठवून सापळा रचला. बनावट ग्राहकाकडून इशारा मिळताच पोलिसांनी तत्काळ फ्लॅटवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आणि पीडित महिलेची सुटका केली.
या प्रकरणी तिन्ही आरोपींविरोधात उत्तमनगर पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.