पुण्यात मोठी कारवाई! ट्रकच्या ट्रक पनीर-खवा जप्त; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका

पुणे : गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात आहे असे असताना आता देखील तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये पुण्यातील बुधवार पेठ परिसरातून 4 ट्रक पनीर-खवा जप्त करण्यात आले आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या ॲक्शनने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे भेसळीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मोठ्या प्रमाणातील हा साठा पाहता कारवाईसाठी अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

जप्त केलेल्या खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. तसेच त्यांची गुणवत्ता आणि साठ्याच्या स्त्रोताबाबत तपास सुरू आहे. गणेशोत्सवात मिठाई आणि खाद्यपदार्थांची मागणी वाढत असल्याने भेसळ रोखण्यासाठी एफडीएकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.


या कारवाईमुळे पुण्यातील खाद्य व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या सण साजरे होत असताना आता सर्व खाद्य पदार्थ कसे बनवले जात आहेत. याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी याबाबत कारवाई सुरू आहे. नाशिकमध्ये देखील अन्न व औषध प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील आर्या कोल्ड स्टोरेज अँड एक्सपोर्टवर छापा टाकण्यात आला. अन्न पदार्थ मिसळयुक्त तसेच कमी दर्जाचे असल्याच्या संशयातून तपासणी करण्यात आली. यामध्ये फ्रोजन कस्टर्ड ॲपल पल्प, मँगो पल्प, क्रीमरचा एकूण 6457 किलो साठा जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, ही देखील एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. याची बाजारात तब्बल 39 लाख 18 हजार 520 रुपये इतकी किंमत आहे. याबाबत तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एफडीएकडून देण्यात आली आहे. यामुळे भेसळ रोखण्यास मदत होणार आहे.