कुसगाव येथील तरुणाचा अपहरण करून खून करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी


पुणे : कुसगाव (ता. भोर) येथून तरुणाचा अपहरण करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळून खुनाचा गुन्हा उलघडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

दिपक धनाजी जगताप (वय ३१ वर्षे, रा. रांजे ता भोर जि पुणे), सागर नानासाहेब लिमन, (वय २६ वर्षे, रा. पारवडी ता. भोर जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावी आहेत. अजय अंकुश मांजरे असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अजय मांजरे यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,अजय याचा अपहरण करून खुन झाला असल्याची गोपनीय बातमी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली. या बातमीची खात्री करणेकरीता स्थानिक गुन्हे शाखेची पाच तपास पथके तयार करून मिसींगचा तपास सुरू केला.

बेपत्ता झालेल्या अजय मांजरे याचा मोबाईल नंबरवरून व्हॉट्स ॲप चॅटींग चालू होती, त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर पुन्हा अजय मांजरे यांच्या भावाने (ता.१९) रोजी राजगड पोलीस ठाण्यात तीन व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

त्यानंतर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे मागदर्शन व सुचनाप्रमाणे पोलीस तपास करत असताना. पोलिसांना माहिती मिळाली कि, आरोपी दिपक जगताप व सागर लिमन खेड शिवापूर परीसरात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.

आरोपींच्या तपासात अपहरण केलेल्या अजय अंकुश मांजरे याचा खुन केला करून आणि मृतदेह प्रेत वरंधा घाटातून दरीत फेकून दिल्याचे निष्पन्न झाले. तसेच आरोपीनी अजय मांजरे याचे अपहरण करतेवेळी त्याचेवर पिस्टल रोखले असल्याचे तपासात पुढे आले. त्या अनुषंगाने तपास करून आरोपींनी खून करून मृतदेह प्रेत ज्या चारचाकी वाहनातून घेवून गेल्याची कबुली दिली.

ते वाहन हस्तगत करून त्या वाहनातून तीन गावठी पिस्टल, आठ जिवंत काडतूसे पोलिसांना मिळाली आहेत. आरोपींनी गुन्हयात वापरलेले दोन मोबाईल तसेच अजय मांजरे याचा खुन केल्यानंतर त्याचा मोबाईल आरोपी घेवून गेले होते, तो मोबाईल हस्तगत केला आहे.

तसेच अजय मृतदेह शोधघेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले असून प्रेताचा शोध घेण्यासाठी सीस्कॅप रेस्क्यू अँड रिलीफ महाड, शिरवळ रेस्क्यू टिम, महाबळेश्वर ट्रेकर्स-महाबळेश्वर या टिमची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आरोपींना भोर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड दिली असून गुन्हयाचा पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा करत आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षकअंकित गोयल, पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सपोनि नेताजी गंधारे, सपोनि महादेव शेलार, सपोनि राहुल गावडे, पोसई प्रदीप चौधरी, पोसई अभिजीत सावंत, पोसई गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, राजु मोमीण, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, मंगेश भगत, बाळासाहेब कारंडे, हनुमंत पासलकर, विजय कांचन, हेमंत विरोळे, धिरज जाधव, विक्रम तापकीर, अजय घुले, योगेश नागरगोजे, समाधान नाईकनवरे, तुषार भोईटे, निलेश सुपेकर, प्रसन्ना घाडगे, प्रमोद नवले, अक्षय सुपे, मुकुंद कदम, यांच्या मदतीने केली असून पुढील तपास राजगड पोनि सचिन पाटील, पोसई देठे हे करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!