बँक कर्मचाऱ्यांसाठी ‘पाच दिवसांचा आठवडा’ लागू करा! बारामतीत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा एल्गार


बारामती : केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रीयकृत बँकांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठीही पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी आज बारामतीत स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)सह विविध राष्ट्रीयकृत बँकांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.

बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आठवड्यातील दोन दिवस साप्ताहिक सुट्टी मिळावी, तसेच केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच बँकिंग क्षेत्रातही पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

बँकिंग क्षेत्रातील वाढता कामाचा ताण, बदलती बँकिंग व्यवस्था आणि डिजिटल युगामुळे वाढलेल्या जबाबदाऱ्या लक्षात घेता, बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करणे आवश्यक असल्याचे आंदोलक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सांगितले.

या मागणीची केंद्र व राज्य सरकारने तातडीने दखल घेऊन राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!