महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! पुढील 24 तासांत ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; पंजाबराव डखांचा अंदाज


पुणे : राज्यात पावसाने चिंता वाढवली आहे. ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक भागांमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे. जलसाठे धोक्यात आले असून पिकांवरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यात वरुणराजा कधी हजेरी लावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात चांगल्या पावसाची प्रतीक्षा असतानाच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून, त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भापासून पावसाला सुरुवात होऊन त्यानंतर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. याबाबत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा नवा अंदाज समोर आला आहे.

पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पूर्व विदर्भाकडून पश्चिम विदर्भाकडे, त्यानंतर मराठवाडा आणि पुढे उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागांत पावसाची शक्यता आहे. हा पाऊस शेतातील पिकांसाठी दिलासादायक ठरू शकतो.

11 सप्टेंबर रोजी वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 12 आणि 13 सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भासह पश्चिम विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

यानंतर पावसाची मराठवाड्यात एन्ट्री होण्याची शक्यता असून, 13, 14 आणि 15 सप्टेंबर रोजी राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहू शकतो. मराठवाड्यातून हा पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे आणि त्यानंतर मुंबईच्या दिशेने सरकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

25 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट

दरम्यान, 11 सप्टेंबर रोजी देशातील 25 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून (IMD) अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, झारखंड, अरुणाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, मेघालय आणि मिझोरामसह अनेक राज्यांचा यामध्ये समावेश आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!