भयंकर घटनेने पुणे हादरलं! रेल्वे ट्रॅकवर गांजा पिणाऱ्या टोळक्याने कोयत्याने पोलीस शिपायाचा गळा चिरला, अन्…


पुणे : पुण्यात एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे पोलीस कर्मचाऱ्यावरच हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे रेल्वे स्थानकातील रेल्वे रुळांवर गांजा पिणाऱ्या टोळ्याने एका पोलीस शिपायाचा कोयत्याने गळा चिरल्याचा प्रकार घडला आहे. हल्ला झालेल्या पोलीस शिपायाचे नाव अक्षय बांबल असे आहे.

या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून याबाबत तपास सुरु आहे. याबाबत माहिती अशी की, पुण्यातील रेल्वे स्थानकाच्या परिसरात हा प्रकार घडला. पोलीस शिपाई अक्षय बांबल हे रेल्वे स्थानकाच्या परिसरात ड्युटीवर होते. त्यावेळी त्यांन काहीजण गांजा पिताना दिसले. पोलीस शिपाई अक्षय बांबल त्यांच्याजवळ गेले आणि त्यांनी या टोळक्याला विचारणा केली.

यावेळी गांजाच्या नशेत असलेल्या टोळक्याने अक्षय बांबल यांच्यावर हल्ला केला. या टोळक्याने धारदार कोयत्याने अक्षय बांबल यांचा गळा चिरला. यामध्ये ते जखमी झाले आहेत. बांबल यांच्यावर हल्ला करणाऱ्या टोळीतील किती जणांना अटक झाली आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. या थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

थेट पोलीस कर्मचाऱ्यावरच जीवघेणा हल्ला झाल्याने शहरातील गुंडांना पोलिसांचे आणि कायद्याचे भय उरले आहे की नाही, असा सवाल विचारला जात आहे. थेट पोलीस कर्मचाऱ्यावरच हल्ला झाल्याने पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. थेट पोलीस कर्मचाऱ्यावरच जीवघेणा हल्ला झाल्याने शहरातील गुंडांना पोलिसांचे आणि कायद्याचे भय उरले आहे की नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.

दरम्यान, कोयता गँगचे हल्ले ही एव्हाना सामान्य बाब असावी, इतके गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातील टोळीयुद्धाच्या घटनाही चर्चेचा विषय असतात. मात्र, आता थेट पोलीस कर्मचाऱ्यावरच हल्ला झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सध्या पोलीस तपास सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!