सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! महिन्याच्या अखेरीस दर घसरले, आजचा भाव किती?

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दरम्यान, आज ३१ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय बाजारासह देशांतर्गत बाजारातही सोनं आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे.
महिन्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही मौल्यवान धातू स्वस्त झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. उद्यापासून सप्टेंबर महिन्याला सुरुवात होणार असून, त्याआधी आज सोनं-चांदीचे दर किती घसरले आहेत, जाणून घेऊया.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं-चांदी स्वस्त
कॉमेक्स या आंतरराष्ट्रीय बाजारातील आकडेवारीनुसार, सोन्याच्या दरात १.१५ टक्क्यांची घसरण झाली असून, सोनं प्रति औंस ४,४७७.८० डॉलरवर पोहोचलं आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात १.७१ टक्क्यांची घट झाली असून, चांदी प्रति औंस ६५.८५० डॉलरवर व्यवहार करत आहे.


MCX वर सोन्याच्या दरात ₹१,८८७ ची घसरण
देशांतर्गत बाजारातही सोनं आणि चांदीच्या दरात घट झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या दरात तब्बल ₹१,८८७ ची घसरण झाली. त्यामुळे सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ₹१,५४,३९४वर आला आहे.
तर चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास चांदीचा दर ₹३,३९४ ने घसरून प्रति किलो ₹२,३९,०५०वर पोहोचला.
२४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर किती?
आजच्या दरानुसार भारतात २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम सुमारे ₹१,५४,३९४ आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ₹१,४१,८३६च्या आसपास आहे.
दरम्यान, १८ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम सुमारे ₹१,१६,०४८ इतका आहे. चांदीचा दर सध्या प्रति किलो सुमारे ₹२,३९,०५० आहे.
सणासुदीपूर्वी दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा
सप्टेंबरपासून सणासुदीच्या काळाला सुरुवात होणार आहे. या काळात सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे सणासुदीपूर्वी सोनं आणि चांदीच्या दरात झालेली घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक ठरू शकते.
मात्र, सोन्या-चांदीचे दर बाजारातील घडामोडींनुसार सतत बदलत असल्याने खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सराफा बाजारातील ताजे दर तपासणे महत्त्वाचे आहे.