पुणे जिल्ह्यात २८ लाख ६८ हजार २२३ ‘अनकलेक्टेबल’ मतदार; दिड लाख दुबार, ३ लाख मयत, सतरा लाख मतदारांचा पत्ताच नाही, पाच लाख स्थलांतरीत; SIR यादी प्रसिद्ध…..

पुणे : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत अंतिम एएसडीडी यादीनुसार पुणे जिल्ह्यातील २८ लाख ६८ हजार २२३ ‘अनकलेक्टेबल’ मतदारांपैकी १ लाख ४३ हजार ९७५ मतदारांची दुबार नोंदणी असून ३ लाख १२ हजार ४८ मयत, १७ लाख ८३ हजार ५८ अनुपस्थित, ५ लाख ९१ हजार ३८ स्थलांतरित, तर ३८ हजार १०४ मतदारांनी गणना पत्रक जमा केलेले नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
जुन्नर मतदार संघातील एकूण ४६ हजार ९४६ अनकलेक्टेबल मतदारांपैकी १३ हजार ३९४ मयत ७ हजार ८०० अनुपस्थित १९ हजार ९४४ स्थलांतरित व इतर १२४ मतदार आहेत.

आंबेगाव मतदार संघातील एकूण ४१ हजार ५०५ अनकलेक्टेबल मतदारांपैकी ११ हजार ९३५ मयत, ३ हजार ९८५ अनुपस्थित, २० हजार ९६२ स्थलांतरित व इतर १११ मतदार आहेत.


खेड आळंदी मतदार संघातील तील एकूण ५६ हजार ०९४ अनकलेक्टेबल मतदारांपैकी ११ हजार ८३६ मयत, २० हजार ९४५ अनुपस्थित, १४ हजार ६०९ स्थलांतरित व इतर ११० मतदार आहेत.
शिरुर मतदार संघातील एकूण १ लाख ९ हजार ९०२ अनकलेक्टेबल मतदारांपैकी १५ हजार ६२६ मयत, ६६ हजार १३५ अनुपस्थित, १८ हजार ८११ स्थलांतरित व इतर ६२८ मतदार आहेत.
दौंड मतदार संघातील एकूण ५३ हजार ९८४ अनकलेक्टेबल मतदारांपैकी १२ हजार ५३ मयत, ९ हजार ३४३ अनुपस्थित, २६ हजार ४२९ स्थलांतरित व इतर ७९ मतदार आहेत.
इंदापूर मतदार संघातील एकूण ५२ हजार २३४ अनकलेक्टेबल मतदारांपैकी १९ हजार ३०८ मयत, ४ हजार ६०४ अनुपस्थित, २२ हजार ८४४ स्थलांतरित व इतर ८९ मतदार आहेत.
बारामती मतदार संघातील एकूण ४४ हजार ८७१ अनकलेक्टेबल मतदारांपैकी १२ हजार २७४ मयत, ६ हजार ४४ अनुपस्थित, २० हजार ८९४ स्थलांतरित व इतर ९१ मतदार आहेत.
पुरंदर मतदार संघातील एकूण १ लाख ८७ हजार ४७१ अनकलेक्टेबल मतदारांपैकी १७ हजार ६५६ मयत, १ लाख ४१ हजार ६०५ अनुपस्थित, १८ हजार १५५ स्थलांतरित व इतर २ हजार ९०४ मतदार आहेत.
भोर मतदार संघातील एकूण ९० हजार ८९७ अनकलेक्टेबल मतदारांपैकी ११ हजार ३५३ मयत, ४५ हजार ७४८ अनुपस्थित, २५ हजार ५२७ स्थलांतरित व इतर ४२० मतदार आहेत.
मावळ मतदार संघातील एकूण ९१ हजार ९२९ अनकलेक्टेबल मतदारांपैकी ९ हजार ८६ मयत, २५९ अनुपस्थित, ७७ हजार ९५ स्थलांतरित व इतर ६३ मतदार आहेत.
चिंचवड मतदार संघातील एकूण २ लाख ७० हजार २३ अनकलेक्टेबल मतदारांपैकी १७ हजार १०७ मयत, २ लाख २० हजार ४३९ अनुपस्थित, १८ हजार १३० स्थलांतरित व इतर १८३ मतदार आहेत.
पिंपरी मतदार संघातील एकूण १ लाख ६५ हजार ७९५ अनकलेक्टेबल मतदारांपैकी १८ हजार ८२७ मयत, १ लाख १२ हजार ७३८ अनुपस्थित, २६ हजार ७५५ स्थलांतरित व इतर ४७४ मतदार आहेत.
भोसरी मतदार संघातील एकूण १ लाख ७३ हजार २०७ अनकलेक्टेबल मतदारांपैकी १४ हजार ४०२ मयत, १ लाख १७ हजार ११६ अनुपस्थित, २४ हजार ६७ स्थलांतरित व इतर ४ हजार ३८३ मतदार आहेत.
वडगाव शेरी मतदार संघातील एकूण २ लाख ४ हजार १८ अनकलेक्टेबल मतदारांपैकी १६ हजार ४८१ मयत, १ लाख ६१ हजार ५१७ अनुपस्थित, १३ हजार ६१३ स्थलांतरित व इतर १ हजार ६०० मतदार आहेत.
शिवाजीनगर मतदार संघातील एकूण १ लाख २९ हजार ७३१ अनकलेक्टेबल मतदारांपैकी १४ हजार ९६३ मयत, ७३ हजार २५८ अनुपस्थित, ३७ हजार ४८५ स्थलांतरित व इतर १४७ मतदार आहेत.
कोथरूड मतदार संघातील एकूण २ लाख ७ हजार १०३ अनकलेक्टेबल मतदारांपैकी १४ हजार ४१८ मयत, १ लाख ६६ हजार ८९० अनुपस्थित, १९ हजार ९५६ स्थलांतरित व इतर १ हजार ६८६ मतदार आहेत.
खडकवासला मतदार संघातील एकूण २ लाख ७८ हजार ७८ अनकलेक्टेबल मतदारांपैकी १४ हजार १७९ मयत, २ लाख ३२ हजार ८०७ अनुपस्थित, २२ हजार ३७३ स्थलांतरित व इतर १ हजार ८६४ मतदार आहेत.
पर्वती मतदार संघातील एकूण १ लाख ५१ हजार ८८२ अनकलेक्टेबल मतदारांपैकी १६ हजार ३३२ मयत, ६ हजार ६३१ अनुपस्थित, १ लाख २४ हजार ९६८ स्थलांतरित व इतर ३१ मतदार आहेत.
हडपसर मतदार संघातील एकूण २ लाख ९८ हजार ४२७ अनकलेक्टेबल मतदारांपैकी १४ हजार ७१८ मयत, २ लाख ५७ हजार १३० अनुपस्थित, १३ हजार २३० स्थलांतरित व इतर ६ हजार ४३९ मतदार आहेत.
पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघातील एकूण १ लाख २१ हजार ५७७ अनकलेक्टेबल मतदारांपैकी ११ हजार ५८१ मयत, ९० हजार ९४३ अनुपस्थित, ९ हजार ५०९ स्थलांतरित व ५ हजार ८०५ इतर मतदार आहेत.
कसबा पेठ मतदार संघातील एकूण ९२ हजार ५४९ अनकलेक्टेबल मतदारांपैकी २४ हजार ५१९ मयत, ३७ हजार १२१ अनुपस्थित, १५ हजार ६८२ स्थलांतरित व १० हजार ८७३ इतर मतदार आहेत.