घरात फक्त आजोबा-नात… तीन महिन्यांचा काळा अध्याय अखेर उघड! पोटदुखीने डॉक्टरांकडे गेली अन् १६ वर्षीय मुलगी अडीच महिन्यांची गर्भवती; ७० वर्षीय आजोबांना अटक


हाथरस : घराच्या चार भिंतींतच एका १६ वर्षीय मुलीवर तीन ते चार महिने लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील हाथरस येथे उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, अत्याचाराचा आरोप तिच्याच ७० वर्षीय आजोबांवर आहे. मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला उपचारासाठी डॉक्टरांकडे नेण्यात आलं आणि तपासणीदरम्यान ती अडीच महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं. यानंतर कुटुंबीयांना धक्का बसला आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईचं निधन झालं असून ती वडील आणि आजोबांसोबत राहत होती. तीन-चार महिन्यांपूर्वी ती नातेवाईकाच्या घरातून सिकंदराराव येथे परतली होती. मुलीच्या आरोपानुसार, २० जून रोजी आजोबांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतरही अत्याचार थांबले नाहीत. मुलीचे वडील कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर घरात ती आणि तिचे आजोबा दोघेच असायचे. याच वेळी आरोपी तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचा आरोप मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे.

शनिवारी मुलीच्या पोटात तीव्र वेदना होत असल्याने तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं. वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर डॉक्टरांनी कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवला. तिने पोलिसांसमोर घडलेला संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर तिच्या जबाबाच्या आधारे ७० वर्षीय आजोबांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधिकारी अमित पाठक यांनी सांगितलं की, अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यात ती गर्भवती असल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी आरोपी आजोबांना अटक केली असून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुलीचा जबाब, वैद्यकीय अहवाल आणि इतर पुरावे तपासून पुढील कायदेशीर कारवाई केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!