पहाटे रेल्वेपुलाखालून आला बाळाच्या रडण्याचा आवाज; बारामतीत पोलीस पोहोचले अन् धक्कादायक दृश्य समोर


बारामती : बारामती तालुक्यातील तांदूळवाडी परिसरातून नवजात मुलीबाबत धक्कादायक घटना समोर आली आहे. दादा पाटीलनगर रेल्वे पुलाखाली एका नवजात बालिकेला सोडून दिल्याचे आढळून आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बुधवारी पहाटे सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास रेल्वेपुलाखालून बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच बारामती तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना कपड्यात गुंडाळलेली नवजात मुलगी आढळून आली. पोलिसांनी बालिकेला तातडीने ताब्यात घेत वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

जन्मानंतर लगेचच नवजात बालिकेला अशा प्रकारे सोडून देण्यात आल्याने या घटनेमागील कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आई-वडिलांसह संबंधित जबाबदार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस कर्मचारी शाहरुख शकील शेख (वय २६) यांनी फिर्याद दिली आहे. नवजात बालिकेला सोडून देणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, परिसरातील उपलब्ध माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!