कच्च्या तेलाच्या दरात धाडकन वाढ! पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत मोठी बातमी समोर


मुंबई : केंद्र सरकारने शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलवरील करांमध्ये कपात केली. पेट्रोलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क (SAED) शून्य करण्यात आले, तर डिझेलवरील शुल्कही कमी करण्यात आले. मात्र, या निर्णयानंतरही देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून, कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 91 डॉलरवर पोहोचला आहे. मात्र, कच्च्या तेलाच्या किमती वाढूनही भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर आज, 18 ऑगस्ट 2026 रोजी स्थिर आहेत. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) आजचे नवीन दर जाहीर केले आहेत.

पेट्रोल निर्यातीवरील शुल्क 14 ऑगस्टपासून कमी करून शून्य करण्यात आले आहे. यापूर्वी हे शुल्क 3.5 रुपये प्रति लिटर होते. तर डिझेलवरील SAED 25.5 रुपयांवरून 24 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. विमान इंधनाच्या निर्यातीवरील SAED देखील 22 रुपयांवरून कमी करून 19.5 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. देशांतर्गत बाजारात इंधनाचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी सरकारकडून वेळोवेळी या शुल्कांमध्ये बदल केले जातात.

महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्ली: पेट्रोल ₹102.12 | डिझेल ₹95.20 प्रति लिटर
कोलकाता: पेट्रोल ₹113.51 | डिझेल ₹99.82 प्रति लिटर
मुंबई: पेट्रोल ₹111.21 | डिझेल ₹97.83 प्रति लिटर
चेन्नई: पेट्रोल ₹107.77 | डिझेल ₹99.55 प्रति लिटर

दरम्यान, मे महिन्यात पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चार वेळा वाढ केली होती. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल 25 मे 2026 रोजी झाला होता. त्यानंतर दर स्थिर आहेत.

पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात. स्थानिक कर आणि इतर शुल्कांमुळे काही ठिकाणी दर अधिक, तर काही ठिकाणी कमी असतात. सध्या कच्च्या तेलाच्या किमती वाढूनही देशांतर्गत इंधनाचे दर स्थिर असल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, हा दिलासा आणखी किती दिवस कायम राहतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!