हनीमूनला जाताच पत्नीला पीरियड्स आले; त्यानंतर पतीने जे केलं, ऐकून बसेल धक्का..


उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये लग्नानंतर हनिमूनसाठी गेलेल्या एका जोडप्याच्या नात्यात वाद निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेने तिच्या पतीवर मासिक पाळी आल्याच्या कारणावरून मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवर तिचा पती, सासू आणि नणदेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, संबंधित महिलेचा विवाह 30 मे 2023 रोजी दिल्लीतील एका मॅरेज लॉनमध्ये झाला होता. लग्नानंतर ती 2 जून रोजी दिल्लीतील सासरच्या घरी गेली. मात्र, त्यानंतर हुंड्यात दिलेल्या वस्तूंवरून सासरच्या मंडळींकडून टोमणे आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप तिने केला आहे

हनिमूनदरम्यान काय घडलं?

लग्नानंतर सुमारे महिन्याने महिला पतीसोबत अंदमान-निकोबारला हनिमूनसाठी गेली होती. याचदरम्यान तिला मासिक पाळी आली. तक्रारीनुसार, तिला पोटदुखी आणि जास्त रक्तस्रावाचा त्रास होत होता.

महिलेने आरोप केला की, पतीने तिला मासिक पाळीबाबत आधी माहिती का दिली नाही, असा सवाल करत तिच्याशी वाद घातला आणि मारहाण केली. तिने पतीने गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप केला आहे. तिचा आवाज ऐकून हॉटेल कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

पतीने वडिलांना फोन करून तिला घेऊन जाण्यास सांगितले

तक्रारीनुसार, या घटनेनंतर पतीने महिलेच्या वडिलांना फोन करून तिला परत घेऊन जाण्यास सांगितले. तसेच तिच्यासोबत राहायचे नसल्याचेही सांगितल्याचा महिलेचा दावा आहे.

हुंड्यासाठी छळ केल्याचाही आरोप

महिला सासरी परतल्यानंतर सासू आणि नणंदेने पतीची बाजू घेत तिला त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच हुंड्यात दिलेले सामान परत न केल्याचे आणि पतीकडून धमकीचे संदेश पाठवले जात असल्याचेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी महिलेने 15 ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!