सर्वात मोठी बातमी! अखेर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला, दोन जणांची नावे जाहीर….

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम होता. अनेकांमध्ये चुरस असताना आता हा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांची नावं आज शासनाकडून जाहीर करण्यात आली आली आहेत. यामुळे चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये भरत गोगावले यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात चुरस होती. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्त्यांवर स्थगिती देण्यात आली होती.

अखेर आज अखेर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न सुटला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात रस्सीखेच सुरू होती. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले दोघेही इच्छुक होते. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.


आज ही जबाबदारी भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आली. 15 ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय व शासकीय ठिकाणी मुख्य ध्वजारोहण करण्यात आले होते. तसेच रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
दरम्यान, या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. नाशिकमध्ये कुंभमेळा होणार असून यामुळे यासाठी अनेकांनी याठिकाणी पालकमंत्री होण्यासाठी फिल्डिंग लावली होती. याबाबत अनेक दिवसांपासून वाद सुरू झाला होता. यामुळे आता यावर निर्णय झाला आहे.